आरोपनिश्चितीवर फेब्रुवारीत युक्तिवाद
By Admin | Published: January 13, 2016 01:45 AM2016-01-13T01:45:43+5:302016-01-13T01:45:43+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटामधील आरोपींवरील आरोपनिश्चितीबाबत २ फेब्रुवारी रोजी युक्तिवाद करण्याचे निर्देश विशेष मोक्का न्यायालयाने सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांना
मुंबई: मालेगाव २००८ बॉम्बस्फोटामधील आरोपींवरील आरोपनिश्चितीबाबत २ फेब्रुवारी रोजी युक्तिवाद करण्याचे निर्देश विशेष मोक्का न्यायालयाने सरकारी वकील व आरोपींच्या वकिलांना दिले आहेत. गेल्या ७ वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे.
आरोपींवर ठेवण्यात येणाऱ्या आरोपांबाबत सरकारी वकील आणि बचावपक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यात येईल. त्यानंतरच आरोपींवर आरोप निश्चित करण्यात येतील. आरोप निश्चित करणे, ही खटल्याची पहिली पायरी असते.
आरोपींनी त्यांच्यावर लागू करण्यात आलेल्या मोक्काला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तसेच त्यांचा जामीन अर्जही प्रलंबित असल्याने विशेष न्यायालय हा खटला सुरू करू शकले नाही.
अद्याप एनआयएने तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयापुढे सादर केलेला नाही. या केसमध्ये एनआयएने घाई न करण्याची सूचना केल्याचे माजी विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितल्यावर एकच खळबळ
माजली.
जेव्हापासून नवीन सरकार
स्थापन झाले आहे तेव्हापासून आपल्याला या केसमध्ये घाई न करण्यासाठी एनआयए दबाव
आणत असाल्याचे विधान सॅलियन
यांनी प्रसारमाध्यमांसमोर केले
होते. (प्रतिनिधी)