अर्जुन गोहाड ठरला चॅम्पियन
By Admin | Published: February 16, 2017 03:46 AM2017-02-16T03:46:45+5:302017-02-16T03:46:45+5:30
एकतर्फी झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात अर्जुन गोहाडने शिवम कदमचा ६-२, ६-२ असा पराभव करत अखिल भारतीय मानांकित
मुंबई : एकतर्फी झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात अर्जुन गोहाडने शिवम कदमचा ६-२, ६-२ असा पराभव करत अखिल भारतीय मानांकित १४ वर्षांखालील टेनिस स्पर्धेत रोटरी चषकावर नाव कोरले. मुलींच्या गटात हर्षाली मांडवकरने रिजुल सिदानळेचा ६-२, ६-२ असा पराभव करत बाजी मारली.
अखिल भारतीय टेनिस संघटना आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरातच्या ११९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
मुलांच्या अंतिम सामन्यात सुरुवातीच्या सेटमध्ये अर्जुन गोहाडला शिवम कदमने चांगली टक्कर दिली. मात्र अर्जुनने आघाडी घेतल्यानंतर शिवम दडपणाखाली आला. यामुळे शिवमकडून अनेक चुका झाल्या. अर्जुनने एकहाती वर्चस्व राखताना शिवमला पुनरागमनाची एकही संधी न देता ६-२, ६-२ अशा दिमाखदार विजयासह जेतेपदावर नाव कोरले.
मुलींच्या गटात हर्षालीने रिजुलचा ६-२, ६-२ असा
धुव्वा उडवला. दोन्ही खेळाडंूनी सुरुवातीला आक्रमक खेळ केला. मात्र रिजुलला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले. तीच्याकडून झालेल्या चुकांचा फायदा घेत हर्षालीने सामन्यावर पकड मिळवून सहजपणे विजेतेपदाला गवसणी घातली. (क्रीडा प्रतिनिधी)