ललिता आणि अजिंक्यसह १५ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर
By Admin | Published: August 22, 2016 05:36 PM2016-08-22T17:36:07+5:302016-08-22T21:32:46+5:30
ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - महाराष्ट्राची प्रसिद्ध धावपटू ललिता बाबर आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंना मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकत्याच संपलेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ललिताने 3000 मीटर स्टीपलचेसच्या शर्यतीत अंतिम फेरीत ९ वे स्थान मिळवले होते.
ललिता पदकाने हुलकावणी दिली तरी, १९८४ लॉस एंजिल्स ऑलिम्पिकमध्ये पी. टी. उषानंतर अॅथलेटिक्स फायनलसाठी पात्र ठरणारी दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली होती. ललिता १९.७६ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमासह आपल्या हिटमध्ये चौथ्या स्थानी राहताना फायनलला पात्र ठरण्यात यशस्वी ठरली होती.
दुसरीकडे महाराष्ट्राचा गुणी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. तो ही आपल्या गुणवत्तेच्या बळावर भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावत आहे. अजिंक्य आणि ललिता बाबरसह अन्य १५ जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत.
२०१६ अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे -
रजत चौहान (तिरंदाजी)
ललिता बाबर (अॅथलेटिक्स)
सौरव कोठारी (बिलियर्ड्स अँड स्नूकर)
शिवा थापा (बॉक्सिंग)
अंजिक्य रहाणे (क्रिकेट)
सुब्रता पॉल (फुटबॉल)
राणी (हॉकी)
रघुनाथ व्ही आर (हॉकी)
गुरप्रीत सिंह (नेमबाजी)
अपूर्वी चंडेला (नेमबाजी)
सौम्यजीत घोष (टेबल टेनिस)
विनेश फोगट (कुस्ती)
अमित कुमार (कुस्ती)
संदीप सिंह मान (पॅरा-अॅथलेटिक्स)
वीरेंद्र सिंह (कुस्ती)