अकोल्यात सशस्त्र संघर्ष; एकाची हत्या

By admin | Published: June 26, 2014 01:54 AM2014-06-26T01:54:51+5:302014-06-26T02:06:35+5:30

काँग्रेस नगरसेविकेच्या पतीसह तीन जखमी

Armed conflict in Akolat; Killing one | अकोल्यात सशस्त्र संघर्ष; एकाची हत्या

अकोल्यात सशस्त्र संघर्ष; एकाची हत्या

Next

अकोला - पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या सशस्त्र संघर्षात मंगळवारी रात्री एकाची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात काँग्रेस नगरसेविकेच्या प तीसह तीन जण जखमी झाले. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अकोल्यातील टिळक रोडवरील मंगलदास मार्केटमध्ये मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गवळीपुर्‍यात राहणारे शेख अक्रम शेख बुरहान नौरंगाबादी, शेख सलिम शेख बुरहान, शेख अली, अकोला महापालिकेतील काँग्रेस नगरसेविकेचे पती महेबूब खान उर्फ मब्बासह काही जण उभे होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून त्यांच्यावर सहा जणांनी हल्ला केला. मध्यस्थीसाठी गेलेल्या महेबूब खानवरही आरोपींनी तलवारीने हल्ला केला. जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रथमोपचारानंतर जखमींना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
याप्रकरणी शेख सलीम शेख बुरहान यांच्या फिर्यादीवरून, रामदासपेठ पोलिसांनी शेख सुलतान शेख यासिन, शेख साजिद शेख सुलतान, शेख रशिद शेख सुलतान, शेख नईम, मो. आरिफ मो. आमद, (सर्व. रा. मरगट) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0७ (प्राणघातक हल्ला), १४३, १४७, १४८, १४९, (गैरकायद्याची मंडळी जमा करणे) ५0४ (धमकी देणे) अन्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान, शेख अक्रमचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे गवळीपुरा परिसरात तणाव निर्माण झाला. शेख अक्रमचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात आणण्यात आला. त्यावेळी गवळीपुर्‍यातील युवकांनी रुग्णालयात धाव घेतली. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी रूग्णालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. शहर पोलिस उपअधीक्षक अमरसिंह जाधव, वाहतूक निरीक्षक शिवसिंग ठाकूर, कोतवालीचे ठाणदोर अनिरुद्ध अढाऊ, रामदासपेठचे एपीआय शिरीष खंडारे, हेकॉँ. सुरेश वाघ यांनी कर्मचार्‍यांसह धाव घेऊन रूग्णालयातील परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, उर्वरित हल्लेखोरांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.

Web Title: Armed conflict in Akolat; Killing one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.