उरणजवळ दिसले शस्त्रधारी संशयित, नौदलाकडून हाय अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2016 03:58 PM2016-09-22T15:58:40+5:302016-09-22T19:56:15+5:30

उरणजवळ चार ते पाच शस्त्रधारी संशयितांना पाहिले असल्याचा दावा दोन शाळकरी मुलांनी केला आहे. त्यानंतर नौदलाने शोधमोहीम सुरु केली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे

Armed suspects seen near Uran, High alert from Navy | उरणजवळ दिसले शस्त्रधारी संशयित, नौदलाकडून हाय अलर्ट

उरणजवळ दिसले शस्त्रधारी संशयित, नौदलाकडून हाय अलर्ट

Next
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. 22 - उरणजवळ चार ते पाच शस्त्रधारी संशयितांना पाहिले असल्याचा दावा दोन शाळकरी मुलांनी केला आहे. त्यानंतर नौदलाने शोधमोहीम सुरु केली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नौदलाच्या शस्त्रसाठा भांडार आयएनएस अभिमन्यूजवळ हे संशयित दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. नौदलासह लष्कर आणि मुंबई दहशतवाद विरोधी पथकासह सर्व सुरक्षा यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे.
 
मुंबई पोलिसांनी अनेक महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावली असून सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. कुलाबा पोलिसांनीदेखील अधिका-यांना अलर्ट दिला असून सुरक्षेवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मार्कोस टीम शाळेत हजर झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अतिरेकी दिसल्याच्या पार्श्वभूवीवर पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर  पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने समुद्रात स्पीड बोटीने तपासणी सुरु केली आहे. समुद्र किनाऱ्यावरील रिसॉर्ट, लॉजेस आणि हॉटेल मध्ये तपासणी केली जात आहे. तसेच नाकाबंदी आणि गस्त वाढवून तपासणी सुरु करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार चार ते पाच संशियत पहाटे 6 वाजता शस्त्रांसह संशयित हालचाली करताना दिसले. मात्र गुप्तचर खात्याने सध्या अशी कोणतीही संशयित गोष्ट आढळली नसल्याचं सांगितलं आहे. 
 
दरम्यान डीजीपी सतीश माथूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, तपास यंत्रणा त्या संशयितांचा शोध घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के पी बक्षी यांनी पोलीस महासंचालकांना यासंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.
 
 
 

Web Title: Armed suspects seen near Uran, High alert from Navy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.