का तुटली सेना-भाजपा युती? नितीन गडकरींनी सांगितलं कारण

By admin | Published: February 24, 2017 08:09 PM2017-02-24T20:09:11+5:302017-02-24T20:09:11+5:30

का तुटली सेना-भाजपा युती? नितीन गडकरींनी सांगितलं कारण, म्हणाले मुंबई मनपात शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही

Army-BJP alliance broken? Nitin Gadkari told the reason | का तुटली सेना-भाजपा युती? नितीन गडकरींनी सांगितलं कारण

का तुटली सेना-भाजपा युती? नितीन गडकरींनी सांगितलं कारण

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - ''मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही.  निवडणुकीच्या काळात शिवसेनेसोबत मतभेद झाले आहेत, मात्र, ते तितके टोकाचे नाहीत'' असं वक्तव्य भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी एबीपी माझासोबत बोलताना केलं. 
 
यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनावर टीका केली. ''मित्रपक्ष असला तरी सामनातील भूमिका योग्य नाही. पंतप्रधान आणि भाजपा अध्यक्षांबाबत सामनातून सातत्याने आक्षेपार्ह लिखाण केलं जातं. त्यामुळेच आमच्यात दरी निर्माण झाली'' असं ते म्हणाले.  ''मित्राचा अपमान करण्यासारखं लिखाण असेल तर संबंधांमध्ये वारंवार अडचण निर्माण होते. मग मैत्री कशी राहणार? या गोष्टी टाळल्या असत्या तर आज भाजपा आणि शिवसेनेमध्ये एवढी कटुता आली नसती'', असं ते म्हणाले.  
 
सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर भाजपाने विजय मिळवला हा ‘सामना’चा आरोप चुकीचा असल्याचंही गडकरी म्हणाले. 
 

Web Title: Army-BJP alliance broken? Nitin Gadkari told the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.