इलेक्ट्रिक बसवरून सेना-भाजपात खडाजंगी

By admin | Published: May 10, 2017 01:49 AM2017-05-10T01:49:00+5:302017-05-10T01:49:00+5:30

राज्य परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बसच्या समावेशावरून भाजपा आणि शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. सुखकर प्रवासासोबत

Army-BJP collapse on electric bus | इलेक्ट्रिक बसवरून सेना-भाजपात खडाजंगी

इलेक्ट्रिक बसवरून सेना-भाजपात खडाजंगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य परिवहन सेवेत इलेक्ट्रिक बसच्या समावेशावरून भाजपा आणि शिवसेना एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. सुखकर प्रवासासोबत प्रवासी वाहतूक नफ्यात आणण्यासाठी एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस घ्याव्यात, अशी भूमिका केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी मांडली. मात्र, इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगावर असणारी मर्यादा आणि चार्जिंग स्टेशनची अनुपलब्धता आदी कारणांमुळे लांब पल्ल्यासाठी या बसेस वापरणे शक्य नसल्याचे, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचे मत आहे.
देशातील ५४ राज्य परिवहन महामंडळांच्या ताफ्यात तब्बल दोन लाख बसेस आहेत. त्या पारंपरिक इंधनावर धावतात. त्यामुळे प्रदूषणासोबतच वाहतूक खर्चात वाढ होते. यावर इलेक्ट्रिक बसेस हा योग्य पर्याय आहे. राज्य परिवहन महामंडळांनी इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदीसाठी योग्य प्रस्ताव सादर केल्यास त्यांना केंद्राकडून आर्थिक मदत केली जाईल, असे नितीन गडकरी यांनी ‘इंडिया इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक समीट-२०१७’ या चर्चासत्रात म्हटले होते.
याबाबत राज्याचे परिवहनमंत्री रावते म्हणाले की, इलेक्ट्रिक बस शहरी वाहतुकीसाठी सोईची असली, तरी लांब पल्ल्यासाठी निरूपयोगी आहे. एसटी प्रामुख्याने लांब पल्ल्याची प्रवासी वाहतूक सेवा देते. त्यामुळे इलेक्ट्रिक बसचा वापर व्यवहार्य ठरणार नाही. मुळात इलेक्ट्रिक बसचा वेग कमी आहे आणि लांब पल्ल्याच्या ठिकाणी चार्जिंग स्थानकांचा प्रश्न आहे. भविष्यात वेग व चार्जिंगचा प्रश्न सुटला, तर याचा विचार होऊ शकतो.

Web Title: Army-BJP collapse on electric bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.