सेना टाकणार बहिष्कार!

By admin | Published: October 31, 2014 02:23 AM2014-10-31T02:23:00+5:302014-10-31T02:23:00+5:30

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

Army boycott boycott! | सेना टाकणार बहिष्कार!

सेना टाकणार बहिष्कार!

Next
आज शपथविधी : भाजपाचे सात मंत्री घेणार शपथ; पाठिंब्याबाबत मतैक्य नाही
नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील भाजपाप्रणीत  सरकारच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यामुळे आता भविष्यात शिवसेना या सरकारमध्ये सामील होणार किंवा कसे यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  शिवसेनेची सोबत घ्यायची की राष्ट्रवादीने देऊ केलेला ‘तटस्थ’ पाठिंबा स्वीकारायचा, याबाबत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सल्लामसलत केली. पण दिवसभराच्या चर्चेनंतरही  त्यावर मतैक्य झाले नाही. 
दिल्लीला जाण्यापूर्वी  फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वत: दूरध्वनी करून शपथविधी समारंभास हजर राहण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी करून घेतले जात आहे, असे संकेत मिळत होते. मात्र, शपथविधी सोहळ्यात शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा समावेश करण्याची मागणी भाजपाने अमान्य केली. शिवाय, राजीव प्रताप रुढी यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार नाहीत, असे टि¦टरद्वारे परस्पर जाहीर करून टाकले.  भाजपाकडून मिळत असलेल्या अशा प्रकारच्या अपमानास्पद वागणुकीमुळे संतापलेल्या शिवसेनेने अखेर बहिष्कारास्त्र बाहेर काढत जशाच तसा प्रतिसाद दिला. 
 
भाजपाकडून तत्याने अपमानास्पद वागणूक 
राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेमधील शिवसेनेच्या सहभागासंबंधीचा गोंधळ संपलेला नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यास शिवसेनेतर्फे कुणीही हजर राहणार नाही. भाजपाकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने आपण शपथविधी सोहळ्याकरिता का हजर राहायचे, अशी बहुतांश आमदारांची भावना झाली असून त्यांनी ती पक्ष नेतृत्वाच्या कानावर घातली आहे.  - विनायक राऊत, सचिव, शिवसेना
 
सेनेसोबत विश्वासदर्शक ठरावानंतरच वाटाघाटी
सेनेच्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न दिसत नाही. त्यामुळे सध्या अल्पमतातील सरकार सत्तारूढ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या ‘तटस्थ’पणावर विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतल्यानंतर सेनेसोबत वाटाघाटी होऊ शकतात.
 
विदर्भातून कार्यकर्ते मुंबईत
शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नागपूर, विदर्भातील हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनांनी मुंबईकडे निघाले आहेत. विमानाचे बुकिंग फुल्ल झाले. शिवाय, विमान तिकिटाचे दर 37 हजारांवर गेले आहेत. रेल्वेचे तिकीट मिळणो तर मुश्कीलच आहे. त्यामुळे हजारो लोक गाडय़ांनी येत आहेत.
 
पासेसचा प्रचंड तुटवडा
भाजपाचे आमदार, खासदार, आजी-माजी नेते, रा.स्व. संघाचे पदाधिकारी, देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक अशा अनेकांना व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी पास हवे असून त्यासाठी मारामार सुरू आहे. पासवाटपाची जबाबदारी असलेले भाजपाचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. भाजपाच्या प्रत्येक आमदाराला 5क् ते 75 पास देण्यात आले पण त्यांना किमान 2क्क् पास हवे आहेत. एकूणच या पासचा गोंधळ आहे.
 
राज हेही अनुपस्थित : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही शुक्रवारी होणा:या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या असून, त्यांचा शपथविधी सोहळा आपण दूरदर्शनवर पाहणार असल्याचे राज यांनी सांगितले.
 
इच्छुक अन् समर्थकांची घालमेल
राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणा:या शपथविधीत आपला नंबर लागणार की नाही, या चिंतेने इच्छुक आमदार आणि त्यांच्या समर्थकांची आज दिवसभर अक्षरश: घालमेल सुरू होती. 
उद्याच्या शपथविधीत समावेश होईल, अशी भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांना अपेक्षा आहे. त्यादृष्टीने ते तयारीत आहेत.
अनेक इच्छुकांनी आज भाजपा कार्यालयात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संघटन मंत्री रवी भुसारी यांच्या गाठीभेटी घेतल्या. पण शुक्रवारी होणा:या शपथविधीत केवळ सात जणांचा समावेश होईल, असे समोर आल्याने अन्य इच्छुकांवर चिंतेचे सावट पसरले.
 
विष्णू सावरा, सुरेश खाडे हेही मंत्रिमंडळात
शपथविधी सोहळ्यात केवळ सात मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे या कोअर कमिटी सदस्यांबरोबर विष्णू सावरा व सुरेश खाडे यांचा समावेश आहे. सावरा हे एसटी असून, खाडे हे एससी आहेत. फडणवीस व मुनगंटीवार हे खुल्या प्रवर्गातील असतील. पंकजा या ओबीसी तर तावडे हे मराठा समाजातील आहेत. फडणवीस व मुनगंटीवार हे विदर्भातील, खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील, पंकजा या मराठवाडय़ातील, तावडे हे मुंबईतील तर सावरा हे ठाणो जिल्ह्यातील आहेत. खाडे हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या माध्यमातून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.

 

Web Title: Army boycott boycott!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.