सेना जिल्हाप्रमुखाची फौजदाराला मारहाण
By Admin | Published: February 13, 2016 11:42 PM2016-02-13T23:42:51+5:302016-02-13T23:42:51+5:30
शहरातील औंढा रस्त्यावर अवैध वाहतुकीच्या आॅटोवर कारवाई करणाऱ्या फौजदाराला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह
हिंगोली : शहरातील औंढा रस्त्यावर अवैध वाहतुकीच्या आॅटोवर कारवाई करणाऱ्या फौजदाराला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कयाधू नदीनजीक अवैध वाहतुकीच्या वाहनांवर कारवाई सुरू असताना एका आॅटोचालकाशी फौजदार बालाजी तिप्पलवाड यांची बाचाबाची झाली. त्यानंतर आॅटोचालकास मारहाण करण्यात आली. संतोष बांगर यांना हे समजल्यानंतर ते घटनास्थळी गेले. तेथे त्यांची तिप्पलवाड यांच्याशी बाचाबाची झाली. त्यात हा प्रकार घडल्याची तक्रार तिप्पलवाड यांनी केली.
संबंधित फौजदाराने आॅटोचालकाकडे हजार रुपये मागितले होते. ते देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण करण्यात आली. हे समजताच मी घटनास्थळी गेलो. - संतोष बांगर, जिल्हाप्रमुख, शिवसेना