सेनेचा अल्टिमेटम मानत नाही
By admin | Published: May 9, 2017 02:08 AM2017-05-09T02:08:45+5:302017-05-09T02:08:45+5:30
‘आम्ही शिवसेनेचा अल्टिमेटम मानत नाही. त्यांना एकट्याला सत्ता हवी होती, पण जनतेने दिली नाही़ त्यामुळे त्यांचा खरा राग
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर/शिर्डी : ‘आम्ही शिवसेनेचा अल्टिमेटम मानत नाही. त्यांना एकट्याला सत्ता हवी होती, पण जनतेने दिली नाही़ त्यामुळे त्यांचा खरा राग जनतेवर आहे, पण जनतेवर रागावता येत नाही़ त्यामुळे कधी-कधी तो राग ते आमच्यावर काढतात. आम्ही तो राग प्रेमाने घेतो,’ असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सोमवारी शिर्डी येथे शिवसेनेला लगावला.
ते म्हणाले, ‘भाजपा कर्जमाफीच्या विरोधात नाही. शेतीत शाश्वत गुंतवणुकीचा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनेला कार्यकर्त्यांना काहीतरी कार्यक्रम द्यावा लागतो. त्यामुळे त्यांनी ते आंदोलन हाती घेतले
असेल. कांद्याच्या भावाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, हा
प्रश्न केवळ आमच्या सरकारच्या काळातील नसून, आघाडी सरकार असताना एकदा कांद्यावर बुलडोझर फिरविण्याचीही वेळ आली होती,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. कांद्याच्या अनुदानाबाबत अद्याप धोरण ठरलेले नसल्याचे ते म्हणाले.