सेना आमदारांची शेतकऱ्याला धमकी

By admin | Published: April 2, 2017 01:30 AM2017-04-02T01:30:24+5:302017-04-02T01:30:24+5:30

शेतीच्या वादातून आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यास टांगून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करमाळ्याचे शिवसेनेचे

Army MLAs threaten farmer | सेना आमदारांची शेतकऱ्याला धमकी

सेना आमदारांची शेतकऱ्याला धमकी

Next

सोलापूर : शेतीच्या वादातून आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या शेतकऱ्यास टांगून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी करमाळ्याचे शिवसेनेचे आ़ नारायण पाटील चर्चेत आले आहेत़ त्या शेतकऱ्याने आ़ पाटील व त्यांच्या गुंड समर्थकांपासून धोका असल्याने संरक्षण देण्याची मागणी केली आहे़ या धमकीची मोबाईल आॅडिओ क्लिप समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे़
‘माझ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांत केसेस का करतो व दाखल केलेली केस काढून घे अन्यथा उलटे टांगून मारेन व गावात राहणे मुश्किल करेन’ अशी धमकी आमदार पाटील यांनी दिल्याची तक्रार शेटफळ येथील शेतकरी रोहिदास राजाराम कांबळे यांनी जिल्हा पोलीसप्रमुखाांकडे केली आहे.तक्रार मागे घेण्यासाठी सचिन सोमनाथ नरुटे, दत्तू गिरमकर व रोहिदास श्रीहरी घोडके यांनी कांबळे यांच्या घरी जाऊन दमबाजी केली़ त्याचबरोबर आ. पाटील यांनी त्यांच्या मोबाईलवरून धमकी दिली असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Army MLAs threaten farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.