लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशकातील तीन संशयितांचा समावेश

By admin | Published: February 27, 2017 11:18 PM2017-02-27T23:18:04+5:302017-02-27T23:18:04+5:30

४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

In the Army Paperfuti case involving three suspects in Nashik | लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशकातील तीन संशयितांचा समावेश

लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशकातील तीन संशयितांचा समावेश

Next

नाशिक : लष्करभरती परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच प्रश्नपत्रिका फुटल्याने ठाणे गुन्हे शाखेने राज्यातील विविध ठिकाणांहून २१ संशयितांना अटक केली आहे़ त्यामध्ये नाशिकमधील संदीप बबन नागरे (३२, रा़वऱ्हेदारणा, ता़निफाड, जि़नाशिक), किरण अशोक गामणे (३२, रा. वऱ्हेदारणा, ता. निफाड, जि़नाशिक) हे दोघे नाशिकमधील नाशिककर करीअर अ‍ॅकेडमीचे संचालक, तर संदीप दौलत भुजबळ (२६, रा़ बिटको पॉइंट नाशिकरोड) हा विद्यार्थी आहे़ या सर्व संशयितांना ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
लष्करभरतीसाठी देशभरात रविवारी (दि़२६) लेखी परीक्षा होणार होती़ मात्र परीक्षेच्या आदल्या दिवशीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे ठाणे गुन्हे शाखेने उघडकीस आणले़ ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, अकोला, वर्धा व नाशिक येथील २१ संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये माजी सैनिक, विविध करिअर अकॅडमीचे संचालक, लष्करातील जवान, अधिकारी तसेच विद्यार्थ्यांचाही समावेश आहे़
लष्कर पेपरफुटी प्रकरणात नाशिकच्या नागरे, गामणे व भुजबळ या तिघांचा समावेश आढळून आल्याने अटक करण्यात आली आहे़ प्रत्येकी चार ते पाच लाख रुपयांना या प्रश्नपत्रिकेची विक्री करीत असल्याचे समोर आले आहे़ यातील संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ दरम्यान, या संशयितांना ठाणे येथील न्यायालयात हजर केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: In the Army Paperfuti case involving three suspects in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.