सेना भाजपाच्या उमेदवारीसाठी चुरस

By Admin | Published: January 31, 2017 07:41 PM2017-01-31T19:41:23+5:302017-01-31T19:41:23+5:30

पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेना व भाजपा या पक्षांकडून उमेदवारी मिळावी

Army picks up for BJP's candidature | सेना भाजपाच्या उमेदवारीसाठी चुरस

सेना भाजपाच्या उमेदवारीसाठी चुरस

googlenewsNext



पंचवटी :  पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ मधून शिवसेना व भाजपा या पक्षांकडून उमेदवारी मिळावी यासाठी सर्वसाधारण, अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्गातून इच्छुकांनी आपापल्या परिने पक्षश्रेष्टींकडे फिल्डींग लावण्यास सुरूवात केलेली आहे. अद्यापपावेतो कोणत्याही पक्षाकडून कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी इच्छकांनी आपापल्या परिने प्रभागात प्रचार यंत्रणा राबविण्याचे काम सुरू करून मलाच उमेदवारी मिळणार हे जाहीर करून टाकले आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याने भाजपाकडून एका विद्यमान तर एका माजी नगरसेवकाला उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर अनूसुचित जाती व इतर मागास प्रवर्गातून उमेदवारीसाठी दोन्ही गटातून जवळपास सात ते आठ इच्छुक असल्याने नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून आहे. इतर मागास प्रवर्ग जागेसाठी माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकारी यांनी दावा केला आहे.
शिवसेनेचीही अशीच काहीशी परिस्थिती असुन सर्वसाधारण जागेसाठी पाच तर इतर मागास प्रवर्गातून सहा अशा इच्छुकांनी दावा केला आहे. अनुसूचित जाती जागेसाठी महिला उमेदवारांत रस्सीखेच असुन शिवसेनेकडून तब्बल सात महिला उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. शिवसेनेकडून अनुसूचित जमाती महिला जागेसाठी उमेदवार निश्चित झाला आहे तर अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग व सर्वसाधारण जागेसाठी उमेदवार निश्चित होणे बाकी आहे. अशीच परिस्थिती भाजपाची असुन सर्वसाधारण व अनुसूचित जमाती महिला जागेसाठी उमेदवार निश्चित मानले असले तरी इतर मागास प्रवर्ग व अनुसूचित जाती महिला जागेसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे.
 

Web Title: Army picks up for BJP's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.