बनावट कागदपत्रांद्वारे सैन्य भरतीत राजस्थानातील लष्करी शिपायाचा समावेश

By admin | Published: August 24, 2016 09:03 PM2016-08-24T21:03:58+5:302016-08-24T21:03:58+5:30

बनावट कागदपत्रांद्वारे दिल्लीतील सैन्यदलात भरती होऊन नाशिकरोडमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी आलेले बालवीर गुजर (२२, राजस्थान), सचिन किशनसिंग (१९,रा़राजस्थान), तेजपाल चोपडा

Army soldiers in Rajasthan recruitment through counterfeit documents | बनावट कागदपत्रांद्वारे सैन्य भरतीत राजस्थानातील लष्करी शिपायाचा समावेश

बनावट कागदपत्रांद्वारे सैन्य भरतीत राजस्थानातील लष्करी शिपायाचा समावेश

Next


ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24  : बनावट कागदपत्रांद्वारे दिल्लीतील सैन्यदलात भरती होऊन नाशिकरोडमध्ये आर्टिलरी सेंटरमध्ये ट्रेनिंगसाठी आलेले बालवीर गुजर (२२, राजस्थान), सचिन किशनसिंग (१९,रा़राजस्थान), तेजपाल चोपडा (१९, रा़राजस्थान) व सुरेश महंतो (२१,रा़राजस्थान) या चौघांना ११ जुलै रोजी नाशिकरोड पोलिसांनी अटक केली होती़ या चौघांना सैन्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती करणाऱ्या संशयितांमध्ये दिल्ली येथील १०५ राजपुताना रायफल्समधील शिपाई गिरीराज घनश्याम चव्हाण (मूळ रा़राजस्थान) याचा समावेश असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़

दरम्यान बनावट कागदपत्रांद्वारे युवकांना सैन्यात नोकरी मिळवून त्यांची फसवणूक करणारे रॅकेट दिल्लीमध्ये सक्रिय असून त्यामध्ये लष्कराचे शिपाई व एजंट यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे़ या प्रकरणातील संशयित गिरीराज चव्हाण यास ताब्यात घेण्यासाठी नाशिकचे पथक दिल्लीला रवाना झाल्याची माहिती पोलीस उप आयुक्त श्रीकांत धिवरे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे़

Web Title: Army soldiers in Rajasthan recruitment through counterfeit documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.