शिवसेनाप्रमुखांवर हल्ला करण्याचा 'लष्कर'चा इरादा होता

By admin | Published: February 12, 2016 08:39 AM2016-02-12T08:39:44+5:302016-02-12T11:35:15+5:30

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लष्कर-ए-तोयबाच्या निशाण्यावर होते, म्हणून आपण शिवसेना भवनची रेकी केल्याचा खुलासा हेडलीने केला.

The Army was aiming to attack Shiv Sena chief | शिवसेनाप्रमुखांवर हल्ला करण्याचा 'लष्कर'चा इरादा होता

शिवसेनाप्रमुखांवर हल्ला करण्याचा 'लष्कर'चा इरादा होता

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - शिवसेना भवन व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भविष्यात हल्ला करताना 'लष्कर-ए-तोयबा'ला उपयोगी पडावी म्हणून आपण शिवसेना भवनमध्ये प्रवेश करून त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असा गौप्यस्फोट करत शिवसेनाप्रमुखांवर हल्ला करण्याचा 'लष्कर'चा इरादा होता असा दावा डेव्हिड हेडलीने केला. मी शिवसेना भवन येथे राजाराम रेगे यांची भेट घेतली, थोड्याच काळात माझी त्यांच्याशी चांगली मैत्रीही झाली. त्यांच्या ओळखीमुळे मला शिवसेना भवनात प्रवेश करता आला असा धक्कादयाक खुलासाही त्याने केला.
अमेरिकेतील अज्ञात स्थळावरून मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयात सोमवारपासून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदवणा-या डेव्हिड हेडलीने आत्तापर्यंत अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. आज चौथ्या दिवशी साक्षीदरम्यान त्याने मुंबईवरील हल्ला कसा आखण्यात आला याची विस्तृत माहितीही दिली. हल्ल्यासाठी मुंबईतील अनेक महत्वाची ठिकाणे निवडण्यात आली मात्र त्यात मुंबई विमानतळाचा समावेश न केल्याने मेजर इक्बाल आणि 'लष्कर-ए-तोयबा' संतापली होती अशी कबुलीही त्याने दिली. तसेच टार्गेटची परिपूर्ण व योग्य माहिती मिळवण्यासाठी बीएआरसीतील (भाभा अणु संशोधन केंद्र) कर्मचा-यांना आयएसआयमध्ये भरती करण्याचा प्लॅनही आखण्यात आला होता, असा धक्कादायक खुलासाही त्याने केला. ' भारताने पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत केलेले हल्ले आणि बॉम्ब स्फोटांचा बदला म्हणून हा (२६/११) हल्ला असेल,' असे आपल्याला लख्वीने सांगितल्याचेही हेडली म्हणाला. 
दरम्या गुरूवारी साक्षीदरम्यान त्याने २००४ साली पोलिस चकमकीत मारली गेलेली इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची सदस्य असल्याचा गौप्यस्फोट केला होता. शुक्रवारी सकाळी पुन्हा साक्ष सुरू झाल्यानंतर त्याने मुंबईवर हल्ला करणा-या दहशवाद्यांना योग्य लँडिंग साईट मिळावी म्हणून आपण गेट वे ऑफ इंडिया, कफ परेड आणि वरळी या ठिकाणांची रेकी करून अखेर कफ परेड हे ठिकाण निश्चित केल्याचे सांगितले. तसेच या हल्लेखोरांना ओळख लपवता यावी व ते भारतीय नागरिकच वाटावेl म्हणून आपण सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरातून त्यांच्यासाठी १५-२० पवित्र गंडे खरेदी केले, असेही हेडलीने नमूद केले.
आज काय म्हणाला हेडली ?
- मुंबईवर हल्ला करणा-या दहशतवाद्यांसाठी लँडिग साईट म्हणून मी गेट वे ऑफ इंडियास कफ परेड आणि वरळी या ठिकाणांची पाहणी केली आणि अखेर कफ परेड हे ठिकाण निश्चित केले. ९ ते १५ एप्रिल २००८ दरम्यान मुंबईचा दौरा केल्यानंतर मी पाकिस्तानला परतलो आणि साजिद मीर, मेजर इक्बाल यांना भेटून लँडिग साईटचे व्हिडीओ दाखवले.
- मी मुंबई विमानतळाचीही रेकी केली होती. पण मुंबई विमानतळ हल्ल्यासाठी टार्गेट म्हणून निवड करण्यात न आल्यामुळे मेजर इक्बाल आणि 'लष्कर-ए-तोयबा' संतापली.
- ५ एप्रिल ते ३० जून २००८ पर्यंत मी पाकिस्तानात होतो, पण त्याच काळात मी न्यूयॉर्क आणि फिलाडेल्फियालाही जाऊन आलो.
- मी सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन परिसराचे व्हिडिओ शूटिंग केले. मुंबईवरील हल्लेखोरांना त्यांची ओळख लपवता यावी आणि ते भारतीयांसारखेच वाटावेत यासाठी मी १५-२० पवित्र गंडे खरेदी केले. पाकिस्तानात गेल्यावर मी ते गंडे साजिद मीरला दिले.
-  १ ते ३० जून २००८ पर्यंत मी पाकिस्तानात होतो, तेव्हा मी साजिद मीर, अबू खफा, अब्दुर रेहमान पाशा, लख्वी आणि मेजर इक्बाल यांना भेटून मुंबईवर हल्ला चढवण्यासाठी निवडण्यात आलेल्या ठिकाणांची माहिती दिली.
- मुंबईवरील हा हल्ला म्हणजे भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्व बॉम्बस्फोटांचे सडेतोड उत्तर असेल, हाच आपला बदला असेल असे लख्वीने सांगितले.
- त्यंत महत्वाची माहिती मिळवण्यासाठी मी भविष्यात भाभा अणु संशोधन केंद्रातून (बीएआरसी) ISI साठी माणसं नेमावीत अशी सूचनना मला मेजर इक्बालने केली होती. मी बीएआरसीला भेट देऊन त्याचा व्हिडीओही बनवला, जो मी साजिद मीर आणि मेजर इक्बाल यांच्या हवाली केला.
- मेजर इक्बालने मला मुंबईतील नौदलाच्या तळाची नीट पाहणी करण्याची सूचना दिली होती. मी रेकी करून लष्करच्या माणसांशी त्याबद्दल चर्चाही केली होती. ज्यू नागरिकांचे कम्युनिटी सेंटर असलेल्या छाबड हाऊसला (नरीमन हाऊस) जुलै २००८ मध्ये मी भेट दिली आणि तिथलेही व्हिडीओ शूटिंग केले. साजिद मीर आणि अब्दुर रेहमान पाशानेच मला तशा सचूना दिल्या होत्या.
- मुंबईतील नौदलाचा तळ आणि सिद्धीविनायक मंदिराभोवती कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असल्याने या दोन्ही ठिकाणांवर हल्ला करू नका अशी सूचना मी 'लष्कर'ला केली होती.
- मला शिवसेना भवनाची पाहणी करायची होती. तिथे मी राजाराम रेगे यांना भेटलो आणि माझी त्यांच्याशी चांगली मैत्रीही झाली.
-  लष्कर ए तोयबा भविष्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवनावर हल्ला करण्याच्या विचारात होती, त्यामुळे शिवसेना भवनची संपूर्ण माहिती काढण्यासाठी रेगेंच्या मदतीनेच शिवसेना भवनात घुसलो
- विलास नावाच्या माणसामुळे एका बॉडी-बिल्डींग कॉम्पिटिशनमध्ये माझी राहुल भट याच्याशी ओळख झाली
 

 

Web Title: The Army was aiming to attack Shiv Sena chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.