सेनेचा पारा उतरला
By admin | Published: November 1, 2014 02:08 AM2014-11-01T02:08:48+5:302014-11-01T02:08:48+5:30
शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही, या भाजपा नेत्यांच्या विधानामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता.
Next
शहांचा फोन गेला : उद्धव ठाकरे सोहळ्याला हजर
मुंबई : शिवसेनेच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही, या भाजपा नेत्यांच्या विधानामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने सरकारच्या शपथविधी सोहळ्य़ावर बहिष्कार घालण्याचा निर्णय गुरुवारी घेतला होता. मात्र केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी केलेली शिष्टाई व तुमच्या अनुपस्थितीचा अर्थ शिवसेनेला सरकारमध्ये सामील होण्यात रस नाही असा घेतला जाईल, असा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या इशा:यामुळे अखेर उद्धव ठाकरे उशिरा का होईना शपथविधी सोहळ्य़ाला हजर झाले.
भाजपाचे नेते राजीव प्रतार रुडी यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार नाहीत, असे जाहीर मत व्यक्त केले. गेले काही दिवस शिवसेनेच्या मंत्रिपदाबाबतच्या मागण्या, खात्यांचा आग्रह याबाबत उलटसुटल बातम्या प्रसिद्ध होत होत्या. याखेरीज भाजपाला शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात रस नाही, असाही सूर काही नेत्यांच्या हवाल्याने प्रसिद्धी माध्यमांतून लावला जात होता. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांतील नाराजी बळावली होती. त्यामुळे शिवसेनेने शपथविधी सोहळ्य़ाला हजर न राहण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी करून शपथविधी सोहळ्य़ाला हजर राहण्याची विनंती केली. दोन व्हीव्हीआयपी पासेस सकाळी मातोश्रीवर पोहोचवण्यात आले होते. त्यानंतर अमित शहा यांनीही ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. शिवसेनेने शपथविधी सोहळ्य़ाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा अर्थ शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी होण्यात रस नाही, असाच घेतला जाईल. दीर्घकाळानंतर सत्ता आल्याने मंत्रिपदांकरिता भाजपामधून मोठी मागणी आहे. या खेरीज मित्रपक्षांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे बहिष्कारानंतर शिवसेनेच्या सरकारमधील प्रवेशाचे समर्थन करताना आमची अडचण होईल, असे शहा यांनी उद्धव यांच्या कानावर घातले.
कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी उद्धव यांच्याशी फारसा संवाद साधला नाही. मात्र अमित शहा यांनी
उद्धव यांचे उपस्थितीबद्दल आभार मानले
व चर्चेची कोंडी फुटली.