अर्णब गोस्वामी म्हणाले, आपल्या जीवाला धोका; फिल्ममेकरनं लिहिलं - मुंबईत एकच राजा...!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: November 10, 2020 05:20 PM2020-11-10T17:20:13+5:302020-11-10T17:27:39+5:30
गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
मुंबई - गेल्या आठवड्यात रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केली. अर्णब यांच्यावर २०१८मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. अर्णब यांना नुकतेच तळोजा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. पोलिसांच्या गाडीतून कारागृहात जाताना अर्णब यांनी, आपल्याला मारहाण करण्यात आली असून जीवाला धोका असल्याचे गाडीतूनच रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना सांगितले.
अर्णब यांच्या या वक्तव्यावर, चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते राम गोपाल वर्मा यांनी ट्विट करत आपले मत मांडले आहे. ते अनेक वेळा आपली मते ट्विटरवरून मांडत असतात. त्यांनी लिहिले आहे 'मुंबईचा राजा कोण? ते आहेत मुंबई पोलीस... आणि हेच एक सत्य आहे.' त्यांच्या या ट्विटवर यूझर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी राम गोपाल वर्मांच्या ट्विटला विरोध केला, तर काहींनी त्यांच्या ट्विटचे समर्थनही केले आहे.
MUMBAI KA KING KAUN? ..It is MUMBAI POLICE ..This is the only true SATYA https://t.co/FKq5qOjBTd
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 9, 2020
'ऑपरेशन अर्णब'साठी करण्यात आली होती मोठी तयारी, गृह विभागानं तयार केली 40 पोलीस कर्मचाऱ्यांची टीम
आनंद नावाच्या एका यूझरने रिअॅक्ट होतांना लिहिले आहे, 'मला माहीत आहे.. पालघर लिंचिंगदरम्यान मी डरपोक पोलिसांना पाहिले आहेत.'
I know..during Palghar lynching I saw coward police..
— 🇮🇳 Ajinkya(Anand) (@innocentlyloud) November 9, 2020
सिद्धार्थ नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'म्हणून तू गोव्याला पळून गेलास का?'
इसीलिए तू गोवा भाग गया क्या?
— 𝕊𝖎𝖉𝖉𝖍𝖆𝖗𝖙𝖍 🥰 👀 (@Boycott_itt) November 9, 2020
‘अर्णब गोस्वामींच्या घराच्या बालकनीत बसून गाणे ऐकण्याची इच्छा...’, रवीश कुमारांची पोस्ट व्हायरल
सुनील अत्री नावाच्या एका यूझरने लिहिले की, 'भिकू म्हात्रेला थोड्या वेळासाठी भ्रम झाला होता.' तर सोनाजी पोहारे यांनी राम गोपाल वर्मा यांचे समर्थन करताना लिहिले आहे, 'फक्त मुंबई पोलीस १०० टक्के बरोबर आहेत.'
यापूर्वीही केली होती एक पोस्ट -
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. यात, शिवसेनेचा वाघ उद्धव ठाकरेने आपल्या पित्यासारखी हिंमत दाखवली आणि भूंकणाऱ्या मांजरीला न्यायालयाच्या पिंजऱ्यात कैद करण्याचे शौर्य दाखवले, अशा आशयाची पोस्ट राम गोपाल वर्मा यांनी केली. या पोस्टमध्ये त्यांनी अर्णब यांच्या नावाचा उल्लेख टाळला. पण त्यांची ही पोस्ट कोणासाठी आहे, हे कळायला लोकांना वेळ लागला नाही.
Am so thrilled about finally the Shivsena tiger Uddhav showing the mettle of his dad in putting the barking cat in a judicial cage
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 4, 2020
अर्णब गोस्वामींना दिलासा; सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका, विधानसभा सचिवांना बजावली नोटीस