पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा!
By admin | Published: June 22, 2017 04:22 AM2017-06-22T04:22:45+5:302017-06-22T04:22:45+5:30
कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळे यांना गळ; संवाद कार्यक्रमात उफाळून आले राष्ट्रवादीतील मतभेद.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गत नगरपालिका निवडणुकीत पक्षांतर्गत बंडाळी आणि गद्दारांनी छुप्या मार्गाने विरोधकांची साथ दिल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात दारूण पराभवाचे तोंड पाहावे लागले. पक्ष वाढीसाठी अत्यंत धोकादायक ठरू पाहणारी ही बाब लक्षात घेऊन सर्वप्रथम पक्षांतर्गत गद्दारांचा बंदोबस्त करा, अशी गळ पक्षाच्या कार्यकर्त्यांंंनी खासदार सुप्रिया सुळे यांना घातली.
२१ जून रोजी स्थानिक जैन भवनात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्यसंवादह्ण कार्यक्रमात पक्षातील अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. यावेळी खासदार सुळे यांच्यासह महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, माजी राज्यमंत्री सुभाष ठाकरे, माजी जिल्हाध्यक्ष पांडुरंग ठाकरे, बाबाराव खडसे, दिलीप जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांंंंनी आपापले मत व्यक्त करताना सांगितले की, जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूकदरम्यान स्थिती सकारात्मक असतानाही ऐनवेळी पक्षातीलच काही मंडळींनी गद्दारी केल्याने पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. वाशिममध्ये पक्षाचे ३0 पैकी केवळ २ नगरसेवक निवडून आले. हीच स्थिती जिल्ह्यातील इतरही नगर परिषदांमध्ये राहिली. त्यामुळे प्रथम पक्षातील अशा गद्दारांना बाजूला करावे लागेल, तेव्हाच पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. इतरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांंंनी पक्षांतर्गत बंडाळीविषयी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त करून जे कार्यकर्ते इमानेइतबारे पक्षाचे काम करतात, त्यांना उमेदवारी मिळावी, त्यांच्या प्रगतीसाठी पक्षाने झटायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शेतक-यांच्या प्रश्नांवर झाली चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या संवाद कार्यक्रमात विशेषत्वाने ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांंंंनी शेतकर्यांच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. वाशिम जिल्ह्याची नाळ शेतीशी जुळलेली असून, येथील ८0 टक्के जनतेचा मुख्य व्यवसाय शेती आहे. असे असताना सर्वाधिक समस्या शेतकर्यांनाच भेडसावत असून, त्या निकाली काढण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली.