गरिबांना दिलासा मिळण्याची व्यवस्था - विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 05:46 AM2018-02-02T05:46:09+5:302018-02-02T05:46:25+5:30
अर्थसंकल्पातून गरीब, दुर्बल, अनुसूचित जाती-जमाती, नोकरदार मध्यमवर्ग, ज्येष्ठ, शेतकरी यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राने सर्वांत मोठी आरोग्य योजना राबविण्याचे ठरविले आहे.
अर्थसंकल्पातून गरीब, दुर्बल, अनुसूचित जाती-जमाती, नोकरदार मध्यमवर्ग, ज्येष्ठ, शेतकरी यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न आहे. केंद्राने सर्वांत मोठी आरोग्य योजना राबविण्याचे ठरविले आहे. दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारून आणि प्राप्तिकर मर्यादेत बदल न करता श्रीमंतांकडून गरिबांना दिलासा मिळण्याची व्यवस्था यात आहे. सर्वांना समाधानी करण्याचा प्रयत्न जेटली यांनी केला. महागाई नियंत्रणात ठेवून व वित्तीय तूट कमी करून आरोग्याची आश्वासने सरकार कशी पूर्ण करते हे पाहायला हवे. या धोरणामुळे ते लोकसभा जिंकतील का, हे काळच ठरवेल.
- विजय दर्डा, चेअरमन एडिटोरिअल बोर्ड,
लोकमत मीडिया व माजी राज्यसभा सदस्य