कार्यकारी अभियंत्याला लाच घेताना अटक
By admin | Published: November 7, 2015 02:19 AM2015-11-07T02:19:14+5:302015-11-07T02:19:14+5:30
रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी पेण येथे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भारती यास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे
अलिबाग : रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी सकाळी पेण येथे प्रभारी कार्यकारी अभियंता अशोक भारती यास एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अशोक भारती यांच्याबाबत लाच घेण्याबाबतच्या अनेक तक्रारी होत्या. मात्र त्यांच्याविरोधात कोणी तक्रार दाखल करीत नव्हते. तक्रारदार नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांची खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग,(खारलॅन्ड) पेण कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण तीन कामे चालू आहेत. त्यातील एका योजनेचे काम पूर्ण केल्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये ५ लाख २७ हजार ५२० रुपये मंजूर होवून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. त्यांच्या उर्वरित दोन कामांची बिले प्रलंबित आहेत. त्या कामांचे धनादेश काढण्यासाठी अशोक भारती याने तक्रारदारांकडे यापूर्वी मिळालेल्या बिलातील १० टक्के स्वत:ला ठेवून उरलेली ९० टक्के म्हणजे पाच लाख रुपयांची रक्कम आपल्याला आणून द्यावी अशी मागणी केली होती.
गुरुवारी झालेल्या चर्चेमध्ये साडेचार लाख रुपयांची लाच घेण्याचे भारती याने मान्य केले. त्यानंतर एक लाख रुपयांचा पहिला हप्ता शुक्रवारी पेण-अंतोरा रस्त्यावरील अभ्युदय बँकेसमोर तक्रारदारांकडून स्वीकारताना अशोक भारती यास रंगेहाथ अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
अशोक भारती बाबत लाच घेण्याच्या तक्रारी होत्या. मात्र त्यांच्याविरोधात कोणी तक्रार दाखल करीत नव्हते. तक्रारदार नोंदणीकृत ठेकेदार आहेत. त्यांची खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग,(खारलॅन्ड) पेण कार्यक्षेत्रात तीन कामे चालू आहेत. त्यातील एका योजनेचे काम पूर्ण केल्यानंतर आॅगस्ट २०१५ मध्ये ५ लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते.