एनएसयूआयच्या मुंबई अध्यक्षाला अटक

By admin | Published: May 25, 2015 04:03 AM2015-05-25T04:03:35+5:302015-05-25T04:03:35+5:30

घाटकोपरमध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एनएसयूआयचा मुंबई अध्यक्ष विपिन सिंगसह त्याच्या तीन साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

The arrest of the NSUI Mumbai President | एनएसयूआयच्या मुंबई अध्यक्षाला अटक

एनएसयूआयच्या मुंबई अध्यक्षाला अटक

Next

मुंबई : घाटकोपरमध्ये तीन पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एनएसयूआयचा मुंबई अध्यक्ष विपिन सिंगसह त्याच्या तीन साथीदारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तर तीन साथीदार पसार झाले असून त्यांचा तपास सुरू आहे.
विपीन सिंगसह साथीदार सुमित सिंंग (२१), विकास उपाध्यय (२७), सिद्धार्थ जयसिंग संपत (३०) या चौघाही आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडीत सुनावण्यात आल्याची माहिती परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त विनयकुमार
राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
घाटकोपर पोलीस ठाण्यात निगराणी पथकाचे प्रमुख असलेले पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे हे त्याचे साथीदार दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख असलेले पोलीस उपनिरीक्षक भूषण पवार यांच्यासोबत शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घाटकोपरच्या हवेली ब्रिजजवळ अ‍ॅन्टी चेन स्नॅचिंग पॉइंटवर साध्या वेषात गस्त घालत होते. यावेळी एनएसयूआयचा पदाधिकारी असलेला सुमित सतीश सिंग (२१) हा मोटारसायकलने चुकीच्या दिशेने आल्याने शिंदे यांनी त्याला अडविले. त्याच्याकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली.
उलट प्रश्न करीत सिंग त्यांच्या अंगवार धावून गेला. इतर सहकारीही पोलिसांच्या अंगावर धावून आले. या वेळी ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगून पोलिसांनी ओळखपत्रही दाखविले. सिंग याने तत्काळ विपिन सिंगला कॉल करून पोलिसाशी वाद झाल्याचे सांगितले. अवघ्या काही मिनिटांतच विपिन सात साथीदारांसह घटनास्थळी दाखल झाला.
पोलिसांना काही कळण्याच्या आतच विपिन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. काहींनी तर बेल्ट काढून त्यांना बेदम मारहाण केली. पावणेदहाच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती मिळताच घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, सातपैकी चार जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या तर इतर तिघांनी पळ काढला. जखमी पोलीस अधिकाऱ्यांना तत्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: The arrest of the NSUI Mumbai President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.