भाजपा मेळाव्यातील राड्याप्रकरणी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजरना अटक

By Admin | Published: April 5, 2016 01:15 PM2016-04-05T13:15:51+5:302016-04-05T13:16:42+5:30

भारतीय जनता पक्षाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी घातलेल्या धुडगूसाप्रकरणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

The arrest of Sudhakar Badgujarana of Shiv Sena in the Rally of BJP rally | भाजपा मेळाव्यातील राड्याप्रकरणी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजरना अटक

भाजपा मेळाव्यातील राड्याप्रकरणी शिवसेनेच्या सुधाकर बडगुजरना अटक

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ५ - भारतीय जनता पक्षाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी घातलेल्या धुडगूसाप्रकरणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांनी मंगळवारी अटक केली. २२ मार्च रोजी नाशिकमध्ये हा प्रकार घडला होता. 
स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या विषयावरून भाजपा-शिवसेनेत रण पेटले. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याचे समर्थन केल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी भाजपाच्या महिला मेळाव्यात घुसून राडा घातला. शिवसैनिकांनी केलेल्या खुर्च्यांच्या फेकाफेकीत महिला व मुलं जखमी झाली होती. पोलिसांनी शिवसैनिकांची धरपकड सुरू केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोषींवर त्वरित कारवाई करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते हटून बसले होते.
याप्रकरणी अखेर आज पोलिसांनी बडगुजर यांना अटक केली. मात्र त्यांच्या अटकेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून बडगुजर यांच्या अटकेला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली. 
 
काय होते प्रकरण?

महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी वेगळ्या मराठवाड्याचे समर्थन केल्याचा आरोप करीत भाजपाच्या महिला मेळाव्यात शिवसैनिकांनी धुडगूस घातला. शिवसैनिकांनी केलेल्या खुर्च्यांच्या फेकाफेकीत महिला व मुलं जखमी झाली.

श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर मराठवाडा स्वतंत्र व्हावा ही जुनीच मागणी असल्याचे रहाटकर यांनी म्हटले. माध्यमांमधून हे समजल्यानंतर शिवसैनिकांनीही व्यूहरचना केली. सायंकाळी आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठान आणि भाजपा महिला आघाडीच्या वतीने मेळावा तसेच विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. सत्कारार्थींचे मनोगत सुरू असतानाच शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्र संघटनप्रमुख सत्यभामा गाडेकर तसेच अन्य महिला तसेच पुरुष शिवसैनिक कार्यक्रमस्थळी घोषणा देत घुसले आणि वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा मागणाऱ्यांचा धिक्कार असो, घोषणा देत गोंधळ घातला. खुर्च्या उचलून फेकण्यास सुरुवात केल्याने उपस्थित महिला आणि अन्य कार्यकर्त्यांची पळापळ सुरू झाली. सेना स्टाइलने उत्तर देण्याच्या प्रकारात अनेक महिला आणि दोन लहान मुलांना खुर्च्या लागल्याने ते जखमी झाले. पोलीस तेथे पोहोचेपर्यंत भाजपा कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वार बंद करून घेतले आणि सेनेच्या महिला कार्यकर्त्यांना पकडून ठेवले. त्यानंतर पोलीस आले आणि धरपकड सुरू झाली.

 

Web Title: The arrest of Sudhakar Badgujarana of Shiv Sena in the Rally of BJP rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.