मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 08:34 AM2024-07-24T08:34:06+5:302024-07-24T08:34:34+5:30

जालना येथे ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये नाट्यनिर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले.

Arrest warrant against Manoj Jarange Patil in pune; Accused of cheating the dramatist | मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप

मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क 
पुणे : नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपा प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक  वॉरंट काढले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे.

जालना येथे ‘शंभूराजे’ या नाटकाचे सहा प्रयोग २०१३ मध्ये आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये नाट्यनिर्मात्यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे निर्मात्याला देण्यात आले नाहीत. नाटकांचे प्रयोग आयोजित करून नाट्यनिर्मात्याचे पैसे बुडविल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबत धनंजय घोरपडे यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. जरांगे यांना दोनदा समन्स बजावले होते. 

Web Title: Arrest warrant against Manoj Jarange Patil in pune; Accused of cheating the dramatist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.