राजू शेट्टीसह चौघांविरुद्ध अटक वॉरंट

By admin | Published: August 9, 2015 02:14 AM2015-08-09T02:14:12+5:302015-08-09T02:14:12+5:30

कोरेगाव येथे २०१३मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राच्या अनुषंगाने कोरेगाव न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते

Arrest warrant against Raju Shetty | राजू शेट्टीसह चौघांविरुद्ध अटक वॉरंट

राजू शेट्टीसह चौघांविरुद्ध अटक वॉरंट

Next

कोरेगाव (जि. सातारा) : कोरेगाव येथे २०१३मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राच्या अनुषंगाने कोरेगाव न्यायालयाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे.
उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा, यासह शेतकरी हिताच्या अनेक मागण्यांसाठी २०१३मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोरेगाव आणि परिसरात तीव्र आंदोलने केली होती. याप्रकरणी वेगवेगळे गुन्हे नोंदवून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एन. पाटील यांनी नुकतेच याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. शेट्टी, सदाभाऊ खोत, ज्येष्ठ नेते भाई पंजाबराव पाटील व जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे यांच्या विरोधात अटक वॉरंट काढले आहे.
कोरेगाव पोलीस ठाण्याने स्वतंत्र कर्मचारी नेमून या वॉरंटची अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. याप्रकरणी २५ आॅगस्टला सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arrest warrant against Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.