निर्दोष सुटका झाल्यानंतरही अटक

By admin | Published: December 5, 2014 03:46 AM2014-12-05T03:46:06+5:302014-12-05T03:46:06+5:30

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या गुन्ह्यासाठी मला अटक केली़ मात्र याची माहिती प्रबोध मेहता कंपनीच्या वकिलाने आधीच माध्यमांना दिली होती़

Arrested after acquitting innocent | निर्दोष सुटका झाल्यानंतरही अटक

निर्दोष सुटका झाल्यानंतरही अटक

Next

मुंबई : मुंबई : सुमारे दोन लाख अमेरिकन डॉलरचे हिरे निर्यात केल्याच्या व्यवहाराचा तपशील नसल्याने अटक झालेले लीलावती रुग्णालयाचे माजी विश्वस्त किशोर मेहता यांनी या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याचा दावा केला आहे़ ही अटक केवळ मला नाहक त्रास देण्यासाठी होती, असेही ते म्हणाले.
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) या गुन्ह्यासाठी मला अटक केली़ मात्र याची माहिती प्रबोध मेहता कंपनीच्या वकिलाने आधीच माध्यमांना दिली होती़ मुळात या प्रकरणात माझी न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे़ तेव्हा ही अटक केवळ मला नाहक त्रास देण्यासाठी होती आणि प्रबोध मेहता यांना बेल्जियम न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे, अशी माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
विशेष म्हणजे ईडीने लकडावाला नावाच्या व्यक्तीच्या नावाने समन्स जारी केले होते़ याचा पत्ताही वेगळा होता़ त्यामुळे माझा चौकशीला जाण्याचा प्रश्नच नव्हता, असा दावाही त्यांनी केला़
दुसरीकडे उच्च न्यायालयाने मेहता यांना परदेशी जाण्याची मुभा दिली आहे़ यासाठी त्यांना याची माहिती आधी पोलिसांना कळवावी लागेल़ मेहता यांनी १९९५-२००२ या काळात दुबई व हाँगकाँग येथे हे हिरे निर्यात केले होते़ मात्र त्याचे पैसेच आले नाहीत, असा ईडीचा आरोप आहे़ यासाठी ईडीने मेहता यांना अटक केली़ त्यानंतर विशेष न्यायालयाने मेहता यांना दोन लाख रुपयांचा जामीन मंजूर केला़ (प्रतिनिधी)

Web Title: Arrested after acquitting innocent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.