परमानंद हेवाळेकरला अटक आणि सुटका

By admin | Published: September 11, 2016 05:05 PM2016-09-11T17:05:54+5:302016-09-11T17:11:18+5:30

परमानंद सावळाराम हेवाळेकर याला पोलिसांनी अटक करून नाट्यमय रित्या शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली.

Arrested and rescued Paramand Havelarekar | परमानंद हेवाळेकरला अटक आणि सुटका

परमानंद हेवाळेकरला अटक आणि सुटका

Next

ऑनलाइन लोकमत

सावंतवाडी, दि. ११ -  विनयभंग प्रकरणात फरार असलेल्या परमानंद सावळाराम हेवाळेकर याला पोलिसांनी अटक करून नाट्यमय रित्या शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. 

दरम्यान कुडाळ  पोलिसांनी एवढी लपवा छपवी करीत फरार आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे कारण काय असा सवाल सर्व थरातून व्यक्त होत आहे महादेवाचे केरवडे येथील हेवाळेकर दांपत्याने मंत्रालय समोर उपोषण केले होते. 
 
त्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी बोलवून व्यथा ऐकून घेतली तसेच त्यांना वर्षा बंगल्यावर पूजेचा मान दिला होता. त्यानंतर हेवाळेकर हा फरार आरोपी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्याच्यावर 2013 मध्ये कुडाळ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल असून तो या गुन्हयात फरार असल्याचे स्पष्ट झाले होते. 
 
कुडाळ येथील न्यायालयाने त्याच्या घरावर नोटीस ही चिकटवली होती.मात्र हेवाळेकर उपोषणाला बसतो मुख्यमंत्र्याना भेटतो मग पोलिसांना का मिळत नाही. असा उपस्थित केला जात होता. त्यातच पोलिसांनी हेवाळेकर यांच्या अटकेची कुठे ही चर्चा न करता शनिवारी रात्री नाट्यमय रित्या अटक केली.

Web Title: Arrested and rescued Paramand Havelarekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.