करीमलालाच्या भाच्याला एमडी विक्रीमुळे अटक
By admin | Published: January 12, 2015 03:22 AM2015-01-12T03:22:57+5:302015-01-12T03:22:57+5:30
एकेकाळी सोनेतस्करीत कुप्रसिद्ध असलेल्या करीमलालाचा भाचा मोहंमद जफर हैदर खान (४१, रा. कौसा मार्केट) याला मेफे ड्रॉन अर्थात ‘एमडी’ची विक्री करताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक
ठाणे : एकेकाळी सोनेतस्करीत कुप्रसिद्ध असलेल्या करीमलालाचा भाचा मोहंमद जफर हैदर खान (४१, रा. कौसा मार्केट) याला मेफे ड्रॉन अर्थात ‘एमडी’ची विक्री करताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने अटक केली आहे. १२ हजार ५०० रुपयांच्या २५ ग्रॅम एमडी पावडरसह चाकूही हस्तगत करण्यात आला आहे.
कौसा मार्केट परिसरात जफर एमडी पावडरची विक्री करीत असल्याची ‘टीप’ अंमलीपदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.बी. धर्माधिकारी यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने जफरला कौसा मार्केट परिसरातून ९ जानेवारीला ताब्यात घेतले. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या जफरला या पावडरच्या सेवनाचे व्यसन आहे. व्यसन पूर्ण करण्यासाठी तो याच पावडरची ४०० ते ५०० रुपये ग्रॅमने विक्रीही करीत होता. १९७० ते ८०च्या दशकात सोनेतस्करीत कुप्रसिद्ध असलेला करीमलाला याचा तो भाचा आहे. ही पावडर तो कोणाकडून आणत होता, त्याचे आणखी साथीदार कोण आहेत, याचाही तपास करण्यात येत असल्याचे धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)