मनोरुग्णांचे कलागुण पुन्हा एकदा उमलणार

By admin | Published: May 21, 2016 03:31 AM2016-05-21T03:31:12+5:302016-05-21T03:31:12+5:30

मनोरुग्णालयातील गेले आठ महिने बंद पडलेले डे केअर सेंटर लवकरच पुनरुज्जीवित होणार

The art of psychiatrists will again be seen | मनोरुग्णांचे कलागुण पुन्हा एकदा उमलणार

मनोरुग्णांचे कलागुण पुन्हा एकदा उमलणार

Next

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- प्रादेशिक मनोरुग्णालयातील गेले आठ महिने बंद पडलेले डे केअर सेंटर लवकरच पुनरुज्जीवित होणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून हे सेंटर पुन्हा उभे केले जाणार आहे. त्यामुळे त्याचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना दिलासाच मिळणार आहे. त्यांच्यातील कलागुण फुलवण्यास याचा आधार मिळणार आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्यांच्या मनोरंजनासाठी विविध कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्यावरील ताण कमी व्हावा, यासाठी त्यांचे मन कशात तरी गुंतावे म्हणून त्यांना विविध कला शिकवल्या जातात. त्यांना व्यक्त होण्याचे व्यासपीठही उपलब्ध करून दिले जाते.
जे मनोरुग्ण प्रादेशिक मनोरुग्णालयातून उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत, अशांसाठी साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी एनआरएचएम योजनेंतर्गत डे केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. बरे होऊन गेलेल्या रुग्णांच्या अंगी दडलेली कला विकसित करण्याचे काम येथून केले जात असे. या सेंटरचा लाभ बाहेरचे रुग्णही घेत असत. विशेषत: यात ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग अधिक होता.
दिवसाला ४० रुग्ण या सेंटरमध्ये येत असत. त्यांच्यासाठी
विविध उपक्रम राबवले जात. त्यांना विविध कला शिकवल्या जात. या रुग्णांसाठी मानसोपचारतज्ज्ञ, आॅक्युपेशनल थेरपिस्ट काम करीत होते. त्यांना शासनाकडून
येणारे मानधन कालांतराने मिळणे
बंद झाले. त्यामुळे हे सेंटरही बंद झाले.
हे सेंटर सुरू केले तेव्हा देणगीदार पुढे येतील, अशी आशा होती. मात्र, ती फोल ठरली आणि या सेंटरमध्ये काम करणाऱ्या स्टाफच्या मानधनाचा प्रश्न उभा राहिला. आठ महिन्यांपूर्वी
हे सेंटर बंद पडले. मात्र, आता हे
सेंटर पुनरुज्जीवित करण्यासाठी ठाण्यातील ‘आयपीएच’ ही संस्था पुढे आली आहे. स्टाफपासून सर्व सपोर्ट सिस्टीम ही संस्थाच पुरवणार आहे. त्यामुळे बंद पडलेले हे सेंटर पुन्हा एकदा उभारी घेण्यास सज्ज झाले आहे.

Web Title: The art of psychiatrists will again be seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.