कृत्रिम पाणवठे धोकादायक

By admin | Published: May 24, 2017 02:57 AM2017-05-24T02:57:29+5:302017-05-24T02:57:29+5:30

राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात.

Artificial Foliage Dangerous | कृत्रिम पाणवठे धोकादायक

कृत्रिम पाणवठे धोकादायक

Next

गणेश वासनिक  
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्यातील व्याघ्र प्रकल्पांत वन्यजीवांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र हे पाणवठे वन्यप्राण्यांसाठी धोकादायक असून यात साचलेले पाणी प्यायल्याने प्राण्यांना संसर्गजन्य रोग होण्याची भीती वर्तविली गेली आहे. तसेच यात विष कालवून वाघांची शिकार होण्याचीही शक्यता आहे. म्हणून पाणवठे कोरडे करूनच नव्याने पाणी भरण्याच्या सूचना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)ने दिल्या आहेत.
प्रकल्पांत जागतिक वन्यजीव संरक्षण निधीतून कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. दर पाच किमीवर एक पाणवठा, असे नियोजन दरवर्षी केले जाते. यंदाही विदर्भातील सहा व्याघ्र प्रकल्पांत नव्याने १५०० च्यावर कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. मात्र, साचलेले पाणी प्यायल्यास प्राण्यांना जंत, डायरिया, बॅक्टेरिया इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, अशी माहिती अमरावती येथील पशुवैद्यकीय अधिकारी राजेश श्रीराव यांनी दिली.

Web Title: Artificial Foliage Dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.