कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास हे वैचारिक दारिद्र्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 12:00 AM2020-03-06T00:00:57+5:302020-03-06T00:01:01+5:30

विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.

 Artificial project development is ideological poverty | कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास हे वैचारिक दारिद्र्य

कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास हे वैचारिक दारिद्र्य

Next

मुंबई : कृत्रिम प्रकल्पांच्या मागे लागताना आपण काय गमावणार अन् काय कमावणार याचाही विचार केला पाहिजे. निसर्गसुंदर कोकणात कृत्रिम प्रकल्प म्हणजे विकास असे कोणी म्हणत असेल तर ते वैचारिक दारिद्रयच म्हणावे लागेल, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाचा उल्लेख न करता गुरुवारी विधानसभेत केली.
कोकणच्या विकासासाठी नियम २९३ अन्वये उपस्थित करण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोकणचे निसर्गसुंदर वैभव टिकविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कृत्रिम प्रकल्पांना विकास मानून जर आपण हे वैभव घालवणार असू तर त्यासारखे दुसरे वैचारिक दारिद्रय नाही.कोकणच्या विकासासाठी सिंधुरत्न समृदधी विकास योजना सुरू करण्यात आली आहे.येत्या १ मे या महाराष्ट्रदिनी चिपी विमानतळ कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत.त्याचसोबत एलईडी लाईटद्वारे सुरू असणारी मासेमारी बंद करणारा राज्याचा कायदा आणण्यात येईल.पाणबुडीच्या माध्यमातून मरीन लाईफ दाखविण्याची योजना सुरू करण्यासोबतच कोकणातील जलदुर्ग दाखविणारी समुद्री सफर देखील सुरू करण्यात येणार असल्याच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या.
कोस्टगार्ड,पोलीस आदींना खोल समुद्रात चालणारी मासेमारी रोखण्यासाठी सांगण्यात आले आहे.मत्स्यदुष्काळ आदी प्रश्न सोडवण्यात येतील.डिझेलचे परतावे देण्यास सुरूवातही झाली आहे.समुद्री महामार्गाचे काम जलदगतीने पुढे नेण्यात येत आहे.तसेच प्रधानमंत्री जलमिशन योजना थांबवण्यात आलेली नाही.नळाद्वारे जलजोडणीचे काम सुरू आहे.त्याचसोबत चिपी येथील विमानतळावर उपकरणे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.आंबा-काजू बोर्डाच्या समस्याही सोडविण्यात येणार आहेत.येत्या एप्रिल महिन्यात कोकणात व्हायरॉलॉजी प्रयोगशाळा देखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
>मरिनलाइफसाठी पाणबुडी
कोकणात मरिनलाइफचा आनंद लुटण्यासाठी पाणबुडी सुरू करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असेल. मुंबईजवळच्या एलिफंटा बेटापासून ते या सर्व जलदुर्गांची बोटीतून सफर घडविणारा प्रकल्प सुरू करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Web Title:  Artificial project development is ideological poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.