प्रचारातले कलावंत

By admin | Published: September 28, 2014 01:31 AM2014-09-28T01:31:24+5:302014-09-28T01:31:24+5:30

जमशेदपूरची 1996 मधील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपाने माझी निवड केली आणि निवडणूक प्रचार काय असतो याचा मी जवळून अनुभव घेतला.

Artists in the campaign | प्रचारातले कलावंत

प्रचारातले कलावंत

Next
>नितीश भारद्वाज, अभिनेता, दिग्दर्शक
जमशेदपूरची 1996 मधील लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपाने माझी निवड केली आणि निवडणूक प्रचार काय असतो याचा मी जवळून अनुभव घेतला. त्या वेळी एप्रिलच्या त्या टळटळीत उन्हात निघालेली माझी पदयात्ना पाहून लोकांना आश्चर्य वाटायचे. सध्या मात्न राजकारण घसरत चालल्याचे जाणवते. सत्तेच्या खुर्चीची अभिलाषा इतकी प्रचंड आहे, की त्यासाठी संबंधित मंडळी काहीही करायला तयार असतात. हे सारे पाहून वाईट वाटते. 
 
अलका कुबल, अभिनेत्नी
नाव किंवा इमेजमुळे कलावंतांना प्रचाराला बोलावले जाते. पण प्रचारात पक्षाबद्दल बोलणो टाळले पाहिजे आणि एक कलाकार म्हणून ती काळजी घेतलीच पाहिजे. प्रचारात पक्षावर बोलायचे असेल, तर त्या कलावंतांनी रीतसर पक्षातच प्रवेश करावा. एका पक्षाचा प्रचार करताना दुस:या पक्षाला नावे ठेवायची, हे मला पटत नाही. आताचा प्रचार मात्न बटबटीत झाला आहे. प्रचारात वाटेल तेवढा खर्च केला जातो, हे अगदी चुकीचे आहे. 
 
सचिन खेडेकर, अभिनेता
आताचा प्रचार इलेक्ट्रॉनिक मीडियात जास्त होतो. माणसांर्पयत नेतेमंडळी पोहोचतच नाहीत. टीव्हीवर आपले मुख्य नेते दिसताहेत आणि ते बोलताहेत, हाच आपला प्रचार असे प्रत्येक उमेदवाराला वाटते. आपण अधिकाधिक लोकांर्पयत पोहोचावे किंवा स्वत:हून लोकांसमोर जावे याची गरजच उमेदवारांना दिवसेंदिवस कमी वाटायला लागली आहे. निवडणूक प्रचारातल्या खर्चाचे तर मला गौडबंगालच वाटते. 
 
रामदास फुटाणो, वात्नटिकाकार
पूर्वीच्या निवडणूक प्रचारातली महत्त्वाची बाब म्हणजे तेव्हा कार्यकर्ते स्वत: खर्च करायचे. 198क् पूर्वीच्या ज्या निवडणुका होत्या, त्यात कार्यकर्ते स्वखर्चाने काम करायचे. 198क् नंतर त्यांची डिमांड वर गेली. त्या वेळी त्यांना प्रचारासाठी जीप लागायची. 199क् नंतर जीपऐवजी सुमो लागायला लागली. आता त्यांना इनोव्हा हवी असते. उद्या कार्यकर्ते बहुधा हेलिकॉप्टरच मागतील. पूर्वीचे उमेदवार पक्षनिष्ठ होत़े ते पक्षाचाच विचार करायचे. मुळात तेव्हा आजएवढे पक्षच नव्हते. आता उमेदवारांना कुठलाही पक्ष चालतो. नेतेमंडळी वर तडजोड करतात, तर खाली कार्यकत्र्यानी पक्ष बदलला तर काय बिघडले  ?

Web Title: Artists in the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.