अरुण गवळी संचित रजेस अपात्र
By admin | Published: March 9, 2017 01:36 AM2017-03-09T01:36:31+5:302017-03-09T01:36:31+5:30
सुधारित नियमानुसार मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी अपात्र आहे. त्यामुळे त्याची संचित रजेची याचिका फेटाळण्यात यावी
नागपूर : सुधारित नियमानुसार मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी संचित रजा (फर्लो) मिळण्यासाठी अपात्र आहे. त्यामुळे त्याची संचित रजेची याचिका फेटाळण्यात यावी, असे उत्तर राज्य शासनाने बुधवारी नागपूर खंडपीठात सादर केले आहे.
शासनाने अभिवचन रजा (पॅरोल) व संचित रजा (फर्लो) नियमामध्ये सुधारणा केली असून त्यासंदर्भात २८ आॅगस्ट २०१६ रोजी अधिसूचना जारी केली आहे. आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल केले असेल आणि हे अपील प्रलंबित असेल, तर संबंधित आरोपीला संचित रजा दिली जाणार नाही, अशी तरतूद नव्या नियमांत आहे. गवळीला नगरसेवक जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. या शिक्षेविरुद्ध त्याने केलेले अपील मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे त्याला संचित रजा देऊ शकत नाही, असे शासनाचे आहे. यावरील पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. (प्रतिनिधी)