अरुण गवळी पुन्हा तुरुंगाबाहेर, संचित रजा देण्याचे आदेश
By admin | Published: April 26, 2017 04:16 PM2017-04-26T16:16:18+5:302017-04-26T16:51:47+5:30
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी पुन्हा तुरुंगाबाहेर येणार आहे. अरुण गवळीला संचित रजा (फर्लो) देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 26 - मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी पुन्हा तुरुंगाबाहेर येणार आहे. अरुण गवळीला संचित रजा (फर्लो) देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहे.
अरुण गवळीने संचित रजा मिळण्यासाठी कारागृह प्रशासनाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, वर्षातून दोन वेळा प्रत्येकी 14 दिवसांची संचित रजा हा प्रत्येक कैद्याचा अधिकार असल्यामुळे त्याला रजा देण्याचे आदेश खंडपीठाने दिले. यापूर्वी नागपूर खंडपीठाने गवळीला मुलाच्या लग्नासाठी अभिवचन रजा (पॅरोल) दिली होती.
गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा असून सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती.