अरुण गवळीचा जामीन अर्ज फेटाळला
By admin | Published: October 6, 2015 02:49 AM2015-10-06T02:49:23+5:302015-10-06T02:49:23+5:30
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला.
Next
- जामसंडेकर हत्या प्रकरण
मुंबई : शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीची जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. गवळी याने केलेल्या गुन्ह्णाचे गांभीर्य पाहता आणि समाजाचे हित पाहता, त्याला जामिनावर सोडणे योग्य नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने गवळीला दिलासा देण्यास नकार दिला. आईची तब्येत ठीक नसल्याने तिला भावनिक आधार मिळावा, यासाठी कुख्यात गँगस्टर अरुण गवळी याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. यावरील सुनावणी न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.