अरुण गवळीची सुनावणी तहकूब

By admin | Published: November 29, 2015 03:10 AM2015-11-29T03:10:41+5:302015-11-29T03:10:41+5:30

नागपुर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अरुण गवळीला एका गुन्ह्याप्रकरणी सुनावणीसाठी शनिवारी मुंबईत आणण्यात आले होते. न्यायालयाने गवळीच्या हजर राहिल्याची

Arun Gawli's hearing adjourned | अरुण गवळीची सुनावणी तहकूब

अरुण गवळीची सुनावणी तहकूब

Next

मुंबई : नागपुर कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अरुण गवळीला एका गुन्ह्याप्रकरणी सुनावणीसाठी शनिवारी मुंबईत आणण्यात आले होते. न्यायालयाने गवळीच्या हजर राहिल्याची नोंद करून घेत ही सुनावणी तहकूब केली.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला नागपुर कारागृहात ठेवण्यात आले असून त्याच्यावर फसवणूकीप्रकरणी २०१२ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल आहे. यामध्ये त्याची पत्नीही आरोपी आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात त्याचे कुटुंबिय व समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Arun Gawli's hearing adjourned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.