अर्णब गोस्वामींचा धमाकेदार कमबॅक, पहिल्याच शोमध्ये लालू प्रसाद यादव टार्गेट
By admin | Published: May 6, 2017 12:53 PM2017-05-06T12:53:34+5:302017-05-06T13:35:28+5:30
आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पत्रकार व टाइम्स नाऊ (TIMES NOW) या वृत्तवाहिनेचे माजी संपादक अर्णब गोस्वामी यांनी "रिपब्लिक" या नवीन वृत्तवाहिनीद्वारे धमाकेदार कमबॅक केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - आपल्या आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेले पत्रकार व टाइम्स नाऊ (TIMES NOW) या वृत्तवाहिनेचे माजी संपादक अर्णब गोस्वामी यांनी "रिपब्लिक" या नवीन वृत्तवाहिनीद्वारे धमाकेदार कमबॅक केले आहे.
अर्णब यांची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित "रिपब्लिक" ही वृत्तवाहिनी शनिवारपासून (6 मे) सुरू झाली. अर्णब यांनी पहिल्याच दिवशी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यासंदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अर्णब यांनी आपल्या शोमध्ये लालू प्रसाद यादव आणि माफिया डॉन मोहम्मद शहाबुद्दीन कारागृहात असताना (आरजेडीचे माजी खासदार) या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
"रिपब्लिक" वृत्तवाहिनीनं लालू आणि शहाबुद्दीन या दोघांच्या संवादाची ऑडिओ टेप प्रसिद्ध करण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव फोनच्या माध्यामातून शहाबुद्दीनसोबत संवाद साधत आहेत, ज्यात दोघांनी एप्रिल 2016 दरम्यान झालेल्या दंगलीसंदर्भात चर्चा केली आहे.
"रिपब्लिक"नं लालूंसंदर्भातील एवढा मोठा गौप्यस्फोट केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर असंख्य प्रश्नांचा भडीमार होत आहे. हे सर्व प्रकरण समोर आल्यानंतर नितीशकुमार आरजेडीसोबतची युती मोडणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून पत्रकारिता विश्वात अर्णब गोस्वामी यांच्या "रिपब्लिक" वृत्तवाहिनीची प्रचंड चर्चा सुरू होती. अर्णब गोस्वामी यांनी 2016 मध्ये इंग्रजी वृत्तवाहिनी "टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी "रिपब्लिक" वृत्तवाहिनी सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.
नवीन वृत्तवाहिनी सुरू करण्यासाठी इतका वेळ का लागला, याबद्दलचे अर्णब गोस्वामी यांनी वृत्तवाहिनी सुरू होण्यापूर्वी स्पष्ट केले. यावेळी प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबतही गोस्वामी यांनी त्यांचे आभार मानले.