Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 04:44 PM2021-04-21T16:44:27+5:302021-04-21T16:48:12+5:30

Oxygen Express: केंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway | Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

Oxygen Express: महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेसचा मुद्दामहून खोळंबा; शिवसेनेची टीका

googlenewsNext
ठळक मुद्देकेंद्राकडून क्रूर आणि कपटनीतीचे राजकारणमहाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतीलपीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा - सावंत

मुंबई: देशभरात कोरोनाचा कहर कायम असताना दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठी चणचण जाणवत आहे. ऑक्सिजनसाठी रुग्णांचे नातेवाइक वणवण करताना दिसत आहेत. अशातच भारतीय रेल्वेने पुढाकार घेत महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावरून आता शिवसेनेने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway)

शिवसेना नेते आणि खासदार अरविंद सावंत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर टीका करत ऑक्सिजन एक्स्प्रेसला होत असलेल्या विलंबाबात नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पीयूष गोयल यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. अरविंद सावंत पत्रकारांशी बोलत होते. ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे खाते फिरवत बसले आहे, असा आरोपही सावंत यांनी यावेळी केला.

भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

या गतीने कधी मिळणार ऑक्सिजन

केंद्र सरकारमुळेच महाराष्ट्रात ऑक्सिजन एक्स्प्रेस येण्यासाठी विलंब होत असल्याची टीका केली. कळंबोलीहून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस १९ तारखेला निघाली तरी अजून मंगळवारी रात्री २४ तासानंतर अकोला स्टेशनवर होती. आता बुधवारी एक्स्प्रेस ट्रेन रायपूरजवळ आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस विशाखापट्टणमला जाणार आहे आणि ती फिरतेय कुठे माहिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्सिजन येण्यास अजून तीन दिवस लागतील, असा दावा सावंत यांनी केला. 

केंद्राकडून क्रूर आणि कुटनीतीचे राजकारण

देशात कोरोनाचे संकट असताना केंद्र सरकार क्रूर आणि कपटनीतीचे राजकारण करत आहे. या ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडोअर उपलब्ध करून दिला जाईल, असे रेल्वे खात्याने सांगितले होते. पण, तसे होताना दिसत नाही, अशी टीका सावंत यांनी केली आहे. 

“देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ऑक्सिजनची समस्या असेल, तेथे ती दूर केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असल्याचे सांगत असले, तरी बंगालच्या निवडणुका संपायच्या आहेत. या निवडणुका झाल्या की, पंतप्रधान मोदी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करतील, असा दावा सावंत यांनी केला.
 

Web Title: arvind sawant alleged that oxygen express of maharashtra purposely delay due to indian railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.