क्रूझवरील ड्रग्ज कारवाईचं गुजरात अन् भाजप कनेक्शन; राष्ट्रवादीच्या मलिकांनी सांगितला घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 04:09 PM2021-10-06T16:09:33+5:302021-10-06T16:09:39+5:30

एनसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादीला संशय; फोटो आणि व्हिडीओ दाखवत खळबळजनक दावे

aryan khan drug case ncp makes serious allegations on ncb connects it with bjp and gujarat mundra port | क्रूझवरील ड्रग्ज कारवाईचं गुजरात अन् भाजप कनेक्शन; राष्ट्रवादीच्या मलिकांनी सांगितला घटनाक्रम

क्रूझवरील ड्रग्ज कारवाईचं गुजरात अन् भाजप कनेक्शन; राष्ट्रवादीच्या मलिकांनी सांगितला घटनाक्रम

Next

मुंबई: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शंका उपस्थित केली आहे. एनसीबीच्या कारवाईचं भाजपशी कनेक्शन असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. आर्यन खानसोबत क्रूझवरून अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंटला नेणारा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नव्हता. तर तो भाजपचा पदाधिकारी आहे, असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला. त्यांनी या व्यक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतचे फोटोदेखील दाखवले.

भाजपचा पदाधिकारी एनसीबीच्या कारवाईवेळी काय करत होता?
आर्यन खानसोबतच अरबाज मर्चंटलादेखील क्रूझवरून अटक करण्यात आली. त्याला एक जण पकडून एनसीबीच्या कार्यालयात नेत होता. ही व्यक्तीदेखील एनसीबीशी संबंधित नाही. तो भाजपचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत, असा दावा मलिक यांनी केला. त्यांनी भानुशालीचे फोटोदेखील पत्रकार परिषदेत दाखवले. भानुशालीच्या फेसबुक अकाऊंटवर भाजप नेत्यांसोबतचे फोटो आहेत. आता हे अकाऊंट लॉक करण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

भानुशाली गेले १५ दिवस काय करत होता?
मनीष भानुशाली २१ सप्टेंबरला दिल्लीला गेला होता. तिथे त्यानं केंद्रीय मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या, अशी माहिती मलिक यांनी दिली. '२२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत भानुशाली गुजरातमध्ये होता. तिथे त्यानं मंत्रालयात काही बैठका घेतल्या. २२ सप्टेंबर तारीख अतिशय महत्त्वाची आहे. कारण याच दिवशी अदानी समूहाशी ताब्यात असलेल्या गुजरातमधल्या मुंद्रा बंदरावर ३ हजार किलो अंमली पदार्थ सापडले. त्या दिवशी भानुशाली गुजरातमध्येच होता,' असा घटनाक्रम मलिक यांनी सांगितला. २८ सप्टेंबरला भानुशाली मुंबईत आला. मग १ ऑक्टोबरला पुन्हा गुजरातला गेला. तिथे त्यानं राज्य सरकारमधल्या एका मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर तिथून तो मुंबईत परतला आणि क्रूझवर एनसीबीनं केलेल्या कारवाईवेळी तो उपस्थित होता, असं मलिक म्हणाले.

मनीष भानुशाली नेमका कोण?
मनीष भानुशाली मूळचा डोंबिवलीचा रहिवासी आहे. पेशानं व्यवसायिक असलेला भानुशाली २०१२ पर्यंत भाजपचा पदाधिकारी होता. त्यानंतरही तो पक्षात सक्रिय होता. त्याच्या फेसबुक अकाऊंटवर त्याचे भाजपच्या अतिशय मोठ्या नेत्यांसोबतचे फोटो आहेत. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, नारायण राणेंसोबत भानुशालींचे फोटो आहेत.

Read in English

Web Title: aryan khan drug case ncp makes serious allegations on ncb connects it with bjp and gujarat mundra port

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.