एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचं पालन करतो, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 08:21 PM2022-06-30T20:21:36+5:302022-06-30T20:21:46+5:30
फडणवीस यांनी आज घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले. दरम्यान, यापूर्वी फडणवीस यांनी आपण सरकारमध्ये सहभागी नसू असं ते म्हणाले होते. परंतु नतंर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
“एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ट्वीटला रिट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली.
प्रामाणिक कार्यकर्ता के नाते पार्टी के आदेश का मैं पालन करता हूँ. जिस पार्टी ने मुझे सर्वोच्च पद तक पहुँचाया, उसका आदेश मेरे लिए सर्वोपरि है.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 30, 2022
एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे. https://t.co/uBp4yBsU5D
जे. पी नड्डा काय म्हणाले?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यातून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्विकारुन सत्तेत राहण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या व्हिडीओत जेपी नड्डा म्हणतात की, ''महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी मोठ्या मनाने सरकारमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यातून आमच्या नेत्याचे चरित्र दिसून येते. आम्हाला पदाची लालसा नाही, हे यातून स्पष्ट होते,'' असे नड्डा म्हणाले.