राज्यातील तब्बल ६२ लाखांवर शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ

By रूपेश उत्तरवार | Published: August 3, 2022 06:09 AM2022-08-03T06:09:18+5:302022-08-03T06:09:49+5:30

केवळ ३८ लाख शेतकऱ्यांनी घेतला सहभाग. मुख्यमंत्र्यांनी काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली; परंतु मदतीची घोषणा केेली नाही.

As many as 62 lakh farmers in the state not take crop insurance | राज्यातील तब्बल ६२ लाखांवर शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ

राज्यातील तब्बल ६२ लाखांवर शेतकऱ्यांची विम्याकडे पाठ

googlenewsNext

- रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात हवामान विभागाने पुढील काळातही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यात काही जिल्ह्यांतील ३८ लाख शेतकऱ्यांनी पिके सुरक्षित केली असली तरी अखेरची मुदत संपल्याने या प्रक्रियेतून ६२ लाख शेतकरी बाद झाले आहेत. पैशाची चणचण आणि विमा मिळण्याची शाश्वती नसल्याने एक कोटी खातेधारकांपैकी ६२ टक्के शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागच घेतला नाही.

मुख्यमंत्र्यांनी काही नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली; परंतु मदतीची घोषणा केेली नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांकडे पीक विमा काढणे हाच मोठा आधार होता. केंद्राने त्यासाठी १ ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली होती. अखेरच्या दिवसापर्यंत राज्यातील ३८ लाख ४३ हजार ७२४ शेतकऱ्यांनी विमा काढल्याची नोंद आहे. राज्यात शेतकरी खातेधारकांची संख्या एक कोटी आहे. त्यापैकी ३८ टक्के शेतकऱ्यांनी विमा काढला. या शेतकऱ्यांनी २९६ कोटी ५७ लाख ५४ हजार १५१ रुपयांची रक्कम भरली. मात्र, ६२ लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरविली आहे.

अहवालच तयार नाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेत तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. १ ऑगस्टपर्यंत अहवाल तयार होणे अपेक्षित होते. मात्र, नुकसानच मोठे आहे. सर्वेक्षण करताना अडथळे येत आहेत. त्यामुळे अहवाल रखडला आहे.
जिल्हा     शेतकरी     संरक्षित क्षेत्र
यवतमाळ     ३ लाख ९९ हजार     ३ लाख हेक्टर
अमरावती     २ लाख १५ हजार     १ लाख ९१ हजार हेक्टर
औरंगाबाद     ७ लाख २८ हजार     ३ लाख ११ हजार हेक्टर
भंडारा     १ लाख २७ हजार     ५५ हजार हेक्टर
बुलडाणा     ३ लाख ४९ हजार     २ लाख ७७ हजार हेक्टर
गडचिरोली     २४ हजार     १६ हजार हेक्टर
जळगाव     १ लाख ३५ हजार     १ लाख २८ हजार हेक्टर
लातूर     ७ लाख ३७ हजार     ५ लाख हेक्टर
नंदुरबार     ८ हजार     ६ हजार हेक्टर
उस्मानाबाद     ६ लाख ६८ हजार     ५ लाख हेेक्टर 
पालघर     १९ हजार ३७५     १० हजार ८५ हेेक्टर 
रायगड     ६ हजार     २ हजार हेक्टर
सांगली     २३ हजार     १३ हजार हेक्टर
सातारा     ३ हजार     १ हजार हेक्टर
सोलापूर     १ लाख ९५ हजार     १ लाख ६२ हजार
नाशिक     २ लाख     १ लाख ६२ हजार

Web Title: As many as 62 lakh farmers in the state not take crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी