चौंडीमध्ये आज शरद पवार व गोपीचंद पडळकर येत असल्याने मोठा पोलीस बंद तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 10:42 AM2022-05-31T10:42:54+5:302022-05-31T10:43:53+5:30

Ahmadnagar News: जामखेड तालुक्यातील चौंडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकरा वाजता तिथे सभा होणार आहे. याच गावात भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर येणार असल्याने चौंडी मध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

As Sharad Pawar and Gopichand Padalkar are coming to Choundi today, a large police force is deployed | चौंडीमध्ये आज शरद पवार व गोपीचंद पडळकर येत असल्याने मोठा पोलीस बंद तैनात

चौंडीमध्ये आज शरद पवार व गोपीचंद पडळकर येत असल्याने मोठा पोलीस बंद तैनात

googlenewsNext

अहमदनगर - जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आज पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अकरा वाजता तिथे सभा होणार आहे. याच गावात भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर येणार असल्याने चौंडी मध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पडळकर यांच्याकडून गोंधळ होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.

 दरम्यान शरद पवार यांची सभा अकरा वाजता असून गोपीचंद पडळकर यांना दुपारी दोन नंतर सभा घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यापूर्वी ते चौडीत येऊन  सभा घेऊन गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी खबरदारी म्हणून हा बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title: As Sharad Pawar and Gopichand Padalkar are coming to Choundi today, a large police force is deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.