शिवराळ भाषा वापरणा-यांना आशा भोसलेचे चोख प्रत्युत्तर
By admin | Published: October 1, 2016 08:28 AM2016-10-01T08:28:46+5:302016-10-01T08:50:47+5:30
ट्विटरवर असंसदीय भाषा वापरणारया फॉलोअर्सना उद्देशून आशा भोसले यांनी केलेल्या ट्विटमुळे नवा वाद सुरू झाला.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ' सर्जिकल स्ट्राईक'नंतर दोन्ही देशांदरम्यानचे वातावरण तापलेले असून सोशल मीडियावरही शाब्दिक युद्ध पेटलेले दिसते. त्याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या काही 'ट्विट्स'मुळे नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसते. ' ट्विटरवर असंसदीय भाषा वापरणार्या फॉलोअर्सना उद्देशून आशा भोसले यांनी ‘अॅब्युझिव्ह कुत्ते…’ (शिव्या देणारे कुत्रे)' असा शब्द वापरला. आशाताईंचे हे ट्विट ' पाकिस्तानी नागरिकांना ' उद्देशून असल्याची समूजत झाल्यामुळे अनेकांची मनं दुखावली आणि त्यातून नवा वाद सुरू झाला. मात्र आशाताईंनी त्यावर लागलीच आणखी एक ट्विट करत ' मी अॅब्युझिव्ह कुत्ते असं म्हटलं होतं, पाकिस्तान्यांचं नाव कुठे घेतलं' असा सवाल विचारत सर्वांची तोंड बंद केली. आशाताईंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ सर्वजण अवाक झाले.