Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 08:22 PM2023-05-15T20:22:22+5:302023-05-15T20:59:25+5:30

वारकऱ्यांसाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत.

Ashadhi Ekadashi 2023: 5000 special buses will be released from across the state to Pandharpur for Ashadhi Yatra | Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार

Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार

googlenewsNext

मुंबई:आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. पुढील महिन्यात २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून, वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे.  यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. यासाठी नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. आषाढी यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, छ. संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेसाठी सुमारे ५००० गाड्या सोडण्याचे नियोजन एसटी तर्फे करण्यात आले आहे. छ. संभाजीनगर विभागातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशाप्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. 

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून बसेस सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान,यात्रा  काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय,संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Web Title: Ashadhi Ekadashi 2023: 5000 special buses will be released from across the state to Pandharpur for Ashadhi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.