आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:28 PM2020-06-29T19:28:49+5:302020-06-29T19:30:02+5:30

 जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उल्लंघन केल्यास कडक कारवाई 

Ashadhi Ekadashi : Saints padukas will be going to Pandharpur on Tuesday from the district under strict restrictions | आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान 

आषाढी एकादशी : पुणे जिल्ह्यातून कडक निर्बंधात उद्या संतांच्या पादुकांचे होणार पंढरपूरला प्रस्थान 

googlenewsNext
ठळक मुद्देचार पालखी सोहळ्यासाठी प्रत्येकी एक एस.टी बसलाच परवानगी प्रवासात कोठेही पालख्या दर्शनासाठी थांबू नये असे स्पष्ट आदेश

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुणे जिल्ह्यातून केवळ श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव आणि श्री चांगावटेश्वर महाराज या चार संताच्या पादुका परंपरेनुसार पंढरपुरला घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी परवानगी देताना जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध घातले असून, चारही पालख्यांचे मंगळवार (दि.30) रोजी एसटी बसमधून पुणे जिल्ह्यातून कडक पोलीस बंदोबस्तात पंढरपुरला रवाना होणार आहेत. दरम्यान पालख्या दर्शनासाठी कोणी कोठेही प्रयत्न करू नये , प्रवासात कोठेही पालख्या दर्शनासाठी थांबू नये असे स्पष्ट आदेश देखील देण्यात आले आहेत. 

देशासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे गंभीर संकट उभे आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंदा प्रथमच शासनाने पायी पालखी सोहळा रद्द केला. परंतु तब्बल साडे तीनशे वर्षांची परंपरा लक्षात घेऊन शासनाने मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत प्रमुख संताच्या पादुका पंढरपुरला घेऊन जाण्यास परवानगी दिली. तसे नियोजन करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना दिले.त्यानुसार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज, श्री संत सोपानदेव आणि श्री चांगावटेश्वर महाराज या चार संताच्या पादुका एस.टी बसमधून घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये एका पालखी सोहळ्यात प्रत्येक संस्थानच्या केवळ 20 व्यक्तींना सहभागी होता येणार आहे. या 20 व्यक्तींची निवड करताना देखील अनेक निर्बंध घातले आहेत. यात परवानगी देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तींची कोरोना चाचणी करणे बंधनकारक, 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व कॉमर्बिडीटी असलेल्या यात हायपरटेन्शन, बी.पी व अन्य आजार असलेल्या व्यक्तीला सहभागी होता येणार नाही. याशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या सर्व सरकारी अधिकारी, कर्मचारी, पोलीस, एस.टी बस व सर्व्हीस व्हॅनचे चालक या सर्वांचो कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. 

दरम्यान, संतांच्या पादूका असलेली वाहने प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबवता येणार नाही, नागरिकांनी देखील दर्शनासाठी रस्त्यांवर येण्याचा प्रयत्न करू नये, सहभागी होणा-या प्रत्येकाने सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे, मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशचे उल्लंघन केल्यास संबंधितावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

Web Title: Ashadhi Ekadashi : Saints padukas will be going to Pandharpur on Tuesday from the district under strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.