जुन्या, दुर्मीळ झाडाला मिठी मारून आषाढीवारी; सह्याद्री देवराईचा राज्यभरात उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 06:53 PM2020-06-27T18:53:29+5:302020-06-27T18:55:39+5:30

या चळवळीतून गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वात जुनी झाडे आपल्याला मिळणार

Ashadhiwari hugging old and rare tree; sahyadri devrai initiative in state | जुन्या, दुर्मीळ झाडाला मिठी मारून आषाढीवारी; सह्याद्री देवराईचा राज्यभरात उपक्रम

जुन्या, दुर्मीळ झाडाला मिठी मारून आषाढीवारी; सह्याद्री देवराईचा राज्यभरात उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यभरातून वृक्षांच्या माहितीचे संकलन  

पुणे : सध्या अनेक दुर्मीळ झाडे कमी होत आहेत. त्यात औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. ही झाडे वाढावीत, यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या 'सह्याद्री देवराई'तर्फे जुनी झाडे वाचविण्याची मोहिम सुरू केली आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरातील खूप जुन्या झाडांना मिठी मारून त्याचा फोटो सह्याद्री देवराईकडे पाठवायचा आहे. राज्यभरातील ही माहिती संकलित करून आषाढीच्या दिवशी त्या वृक्षांचा उत्सव साजरा होणार आहे.
अभिनेते सयाजी शिंदे आणि चित्रपट लेखक अरविंद जगताप यांनी राज्यभरातील जी काही खुप जुनी झाडे आहेत. त्यांची माहिती एकत्र करण्यासाठी सह्याद्री देवराई कडून दोन मोबाईल नंबर दिले आहेत. नागरिकांनी सह्याद्री देवराई-  ९०९६६४४६७१ यावर आपला जुन्या झाडासोबतचा झाडाला मिठी मारलेला फोटो आणि ते झाड किती वर्षे जूनं आहे, ते कुठे आहे.  


नागरिकांनी फोटोसह झाडे कुठे आहे ? त्यांची परिस्थिती काय आहे? त्याची माहिती द्यायची आहे. २ जुलैच्या आत ही संपूर्ण माहिती सह्याद्री देवराईच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायची आहे. या चळवळीतून गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वात जुनी झाडे आपल्याला मिळणार आहेत.
===============
जुन्या, दुर्मीळ दहा झाडांचे सेलिब्रेशन
यंदाची आषाढीवारी अनोख्या पद्दतीने साजरी करण्याचा निश्चय केला आहे. या आषाढी वारीला या सर्व फोटोंचा डाटा एकत्र करण्यात येणार असून. यातील सर्वात जुन्या दहा झाडांचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने तुम्हांला तुमच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील सर्वांत जुन्या झाडांची माहिती  मिळणार आहे. 
लहान-थोरांपासून सर्वांनी या उपक्रमा सहभागी झाले पाहिजे. कारण झाड हा एक देवच आहे. त्यामुळे आपण जीवंत आहोत. त्यामुळे तुमच्या परिसरातील जुन्या झाडांना मिठी मारून फोटो पाठवा.
- सयाजी शिंदे, अभिनेते 
 
 

Web Title: Ashadhiwari hugging old and rare tree; sahyadri devrai initiative in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.