आशिष शेलारांची पुन्हा शिवसेनेवर टीका, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 09:53 AM2020-02-05T09:53:46+5:302020-02-05T09:57:28+5:30
मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान केले असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.
मुंबई : शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा 2020-21 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. तर या अर्थसंकल्पातून मागील 5 र्षात 25 हजार झाडं तोडण्याची परवानगी देण्यात आल्याचे समोर आले आहे, असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. तर यावरून त्यांनी पुन्हा शिवसेनेवर टीका केली आहे.
शेलार यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, "मुंबई महापालिकेने गेल्या 5 वर्षात मुंबईतील 25 हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली, असे अर्थसंकल्पात स्वतःच जाहीर केले. त्यावेळी पर्यावरण प्रेम कुठे गेले होते"? असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. तर 25 हजार झाडे तोडले असताना, मग मग हट्टाने मेट्रो कारशेडचे काम का थांबवले?, तर मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान केले असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.
मुंबई महापालिकेने गेल्या 5 वर्षात मुंबईतील 25 हजार झाडे तोडण्यास परवानगी दिली, असे आज अर्थसंकल्पात स्वतः च जाहीर केले.
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 4, 2020
त्यावेळी पर्यावरण प्रेम कुठे गेले होते?
मग हट्टाने #मेट्रोकारशेडचे काम का थांबवले?
मुंबईकरांचे 300 कोटीचे नुकसान का केले? #BMCBudget2020
तर यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरून सुद्धा सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली आहे. मुंबईला 2030 पर्यंत आपत्ती मुक्त करणार हे फक्त स्वप्न. या अर्थसंकल्पात केवळ 5 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तर मुंबईकरांना पावसाळ्यातील हाल, पुर परिस्थिती पुन्हा पाहावे लागणार असल्याचा आरोप सुद्धा शेलार यांनी यावेळी केला.