काँग्रेस नेत्याच्या उमेदवारी अर्जावर आशिष शेलारांची हरकत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:20 PM2019-10-05T16:20:17+5:302019-10-05T16:21:39+5:30
वांद्रे पश्चिम मध्ये कॉंग्रेसचा या मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार रफत फरहत हुसैन यांनी पक्षाचा एबी फॉर्म मुदतीत जोडला नाही.
खलील गिरकर
मुंबई : वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रसतर्फे अर्ज दाखल केलेल्या नगरसेवक आसिफ झकेरिया यांच्या उमेदवारी अर्जाबाबत भाजपचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हरकत घेतली आहे. याबाबत दोघांना बाजू मांडण्यासाठी दुपारी वेळ देण्यात आली असून या हरकतीबाबत सायंकाळी निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.
वांद्रे पश्चिम मध्ये कॉंग्रेसचा या मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार रफत फरहत हुसैन यांनी पक्षाचा एबी फॉर्म मुदतीत जोडला नाही व प्रतिज्ञा पत्र अपूर्ण असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. तर, बहुजन समाज पक्षाचे डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या गणेश विश्वनाथ खैरे यांचा अर्ज त्रुटीमुळे फेटाळण्यात आला. त्यामुळे या मतदारसंघातील एमआयएमचे आव्हानलढती पूर्वीच संपुष्टात आले आहे. दरम्यान, उमेदवार रिंगणात राहणार की नाही याचा निर्णय सायंकाळी होईल.