दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे: अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 01:28 PM2019-07-02T13:28:44+5:302019-07-02T13:43:57+5:30
महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
मुंबई - रात्रीपासून मुंबई शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. जनजीवन ठप्प झाले असताना, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणतात मुंबई कुठे तुंबली आहे. यावरूनच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी यांच्यावर टीका केली आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असा टोला अशोक चव्हाण यांनी शिवसेनेला लगावला आहे.
मुंबईसह ठाणे, कोकण परिसरात येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र असे असताना सुद्धा महापौर महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. प्रशासकीय अपयश व नालेसफाईतील भ्रष्टाचारामुळे दरवर्षीच मुंबई पाण्याखाली जाते. पण कधी भरतीवर तर कधी पावसावर खापर फोडून सत्ताधारी मोकळे होतात, हे संतापजनक आहे. दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे. असे चव्हाण म्हणाले.
मालाड आणि पुण्यात भिंत कोसळून २५ जणांचा बळी गेला आहे. यासाठी पावसाइतकाच भ्रष्टाचार सुद्धा कारणीभूत नाही का? असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. कदाचित या सर्व भ्रष्टाचारात सरकार सर्वांना क्लीन चीट सुद्धा देईल. पण त्याने गलेले जीव परत येणार आहेत का? किंवा पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची हमी मिळणार आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी यावेळी विचारला.