अशोक चव्हाणांना वाहतूक कोंडीचा फटका ; पायी चालत गांधी भवन गाठले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 10:06 AM2020-02-06T10:06:24+5:302020-02-06T10:09:08+5:30
दर बुधवारी कुलाबा येथील पक्ष कार्यालयात अशोक चव्हाण हे लोकदरबार भरवतात.
मुंबई : काँग्रेसच्या मुंबईतील गांधीभवन येथील कार्यालयात बुधवारी जनता दरबार भरवण्यात आला होता. या जनता दरबाराला जात असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर कार्यक्रमाला उशीर होत असल्याने त्यांनी पायी चालत गांधी भवन गाठले.
अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, कुलाबा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित लोकदरबार कार्यक्रमाला जाण्यास उशीर झाला. त्यामुळे काही अंतरावर गाडी सोडून मी पायी चालतच गांधी भवन गाठले, असे चव्हाण म्हणाले.
कुलाबा परिसरातील वाहतूक कोंडीमुळे आज मला प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित लोकदरबार कार्यक्रमाला जाण्यास उशीर झाला. अखेर काही अंतरावर गाडी सोडून मी पायी चालतच गांधी भवन गाठले. pic.twitter.com/n4smJbrsai
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 5, 2020
मंत्रालयात प्रचंड गर्दी असल्याने समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मदत करता येत नाही. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी दर बुधवारी कुलाबा येथील पक्ष कार्यालयात अशोक चव्हाण हे लोकदरबार भरवतात. त्यामुळे या ठिकाणी राज्यभरातून शेकडो नागरिकसमस्या घेऊन येतात.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, गांधी भवन, कुलाबा, मुंबई येथे आयोजित तिसऱ्या #लोकदरबार ला आज राज्यभरातून शेकडो नागरिक उपस्थित होते. सभागृह भरगच्च होते व कार्यालयाबाहेरही मोठी गर्दी होती. अनेक भगिनी देखील आल्या होत्या. सर्वांची निवेदने मी स्वीकारली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. pic.twitter.com/TKX1Y10CSh
— Ashok Chavan (@AshokChavanINC) February 5, 2020