अशोक चव्हाणांची जीभ घसरली, दानवेंचा "त्यांच्याच" भाषेत घेतला समाचार
By admin | Published: May 21, 2017 11:44 AM2017-05-21T11:44:15+5:302017-05-21T11:47:31+5:30
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शेतक-यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना शेतक-यांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच आहे. मात्र, दानवेंवर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली आहे. मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना चव्हाण यांनी भाषेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिलं आहे.
मालेगावमध्ये 24 तारखेला महापालिकेची निवडणूक होत आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मालेगाव येथे आले होते. या सभेत हिंदीत भाषण करतेवेळी दानवेंवर टीका करताना चव्हाण यांची जीभ घसरली. काही दिवसांपूर्नी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी अपशब्द वापरले होते. त्या वक्तव्याचा समाचार घेताना अशोक चव्हाण यांची जीभ घसरली.
यावेळी भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना भाजप सरकार हे "सरकार" नसून "सावकार" आहे. हे सरकार गरीबांना लुटण्याचं काम करत असल्याची टीका त्यांनी केली. यावेळी आयोजित सभेत चव्हाणांनी हिंदीतून भाषण करत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप सरकार हे "सरकार" नसून "सावकार" आहे. हे सरकार गरीबांना लुटण्याचे काम करत आहे, अशा शब्दात चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच एमआयएम, समाजवादी पक्ष हे भाजपची बी टीम असल्याचंही ते म्हणाले.